Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणी विवेक अग्निहोत्रींनी मागितली दिल्ली उच्च न्यायालयाची माफी

आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणी विवेक अग्निहोत्रींनी मागितली दिल्ली उच्च न्यायालयाची माफी

Subscribe

2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाने जगभरात खळबळ उडवली. या चित्रपटामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री प्रचंड चर्चेत आले. तेव्हापासून अनेक कारणांमुळे विवेक अग्निहोत्री सतत चर्चेत असतात. बॉलिवूडबाबतची खदखद सोशल मीडियावरुन ते अनेकदा व्यक्त करताना दिसतात. अशातच, विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली उच्च न्यायालयाची माफी मागितली असल्याची बातमी समोर येत आहे.

2018 मध्ये विवेक अग्निहोत्री यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात कार्यकर्ता गौतम नवलखाला दिलासा देण्यात न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्यावर पक्षपाती असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी विवेक अग्निहोत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

2018 मधील त्यांच्या अर्जावरील सुनावणी सुरू होती. विवेक अग्निहोत्रींना गेल्या महिन्यात 10 एप्रिलला न्यायालयानहजर राहण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र, काल ( सोमवार) या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, न्यायालयीन प्रकरणांमध्ये आपण आणि सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशाराही त्यांनी न्यायालयाला दिला.

यावेळी कोर्टाने विवेक अग्निहोत्रींना सांगितलं की, तुम्ही म्हणता की तुम्हाला न्यायालयाचा आदर आणि तुम्ही जाणूनबुजून तसं करण्याचा विचार केला नव्हता. त्यामुळे तुम्हाला जारी करण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस मागे घेण्यात येत आहे. तुम्हाला अवमान केल्याच्या आरोपातून मुक्त करण्यात येत आहे. न्यायालयाने आता या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख 24 मे रोजी निश्चित केली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अजय देवगणचा ‘भोला’ ठरला फिका; आत्तापर्यंत कमावले केवळ ‘इतके’ कोटी

- Advertisment -