विवेक अग्निहोत्री करणार कोविड काळावर आधारित चित्रपट; नाना पाटेकर मुख्य भूमिकेत

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’चित्रपटाच्या यशानंतर विवेक अग्निहोत्री वारंवार विविध कारणांमुळे चर्चेत असतात. या चित्रपटातील विषयाला भारतीयांनी उचलून धरलं. या चित्रपटाला भारतातील काही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला तर काहींकडून यावर टीका करण्यात आली. राजकीय क्षेत्रातही या चित्रपटावरून अनेक खलबतं झाली. मात्र, तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा टप्पा पार केला. दरम्यान, आता इतर घटनांवरही अशा प्रकारचा चित्रपट तयार करण्यात यावा अशी मागणी अनेक प्रेक्षकांकडून केली जात आहे.

‘द काश्मीर फाइल्स’नंतर आता विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाइल्स’ चित्रपटावर सध्या काम करत आहेत. दरम्यान, अशातच आता विवेक अग्निहोत्रींच्या आणखी एका नव्या चित्रपटाची बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाची कथा देशातील कोविड काळामध्ये कशाप्रकरे कोवॅक्सीन ही लस तयार करण्यात आली, तसेच अजिबात न थकता एवढ्या लसी कशाप्रकारे तयार केल्या आणि 250 कोटी लोकांना त्या देण्यात आल्या. हे सर्व विषय ते या चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार आहेत.

विविक अग्निहोत्रींच्या या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.मात्र, या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, निवेदिता भट्टचार्य हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच या चित्रपटात काम करण्यासाठी तेथील स्थानिक कलाकारांना संधी देण्यात येणार आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.


हेही वाचा :

देसी गर्लला भेटण्यासाठी देसी बॉयने मारली भिंतीवरून उडी; पोलिसांनी घेतलं ताब्यात