घरमनोरंजन'प्यार हमे किसी मोड पे ले आया' म्हणत विवेक ओबेरॉयने व्यक्त केली...

‘प्यार हमे किसी मोड पे ले आया’ म्हणत विवेक ओबेरॉयने व्यक्त केली दिलगिरी

Subscribe

विनामास्क वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त विनामास्क, आणि विना हेल्मेट बाईक चालवत वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विवेकने त्यांच्या इंस्टाग्रामवरुन विनामास्क आणि विना हेल्मेट बाईक चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी विवेकला ५०० रुपयांचे ई-चलान पाठवले आहे. याशिवाय जुहू पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. विवेक ओबेरॉयने शेअर केलेल्या पोस्टचा त्याला फटका बसला. यासर्व प्रकारानंतर विवेक ओबेरॉयने आपल्या ट्विटर हँडलवरुन चुकीची कबुली देत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे.

विवेक ओबेरॉय पोलिसांची माफी मागत म्हणाला…

‘प्यार हमे किसी मोड पे ले आया… असं म्हणत विवेक ओबेरॉयने ट्विटर वरून दिलगिरी व्यक्त केली आहे. सुरक्षेची काळजी सर्वात प्रथम घेतली पाहिजे, याची जाणीव करुन दिल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. बाईकवरुन प्रवास करताना हेल्मेट आणि मास्क घाला, असे विवेक ओबेरॉयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

काय होती विवेक ओबेरॉयची पोस्ट

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्त आपल्या पत्नीसोबत बुलेट सवारी केली. परंतु दोघेही विनामास्क आणि विनाहेल्मेट बुलेट सवारीचा आनंद घेत होते. त्यासोबत त्याने “मी, माझी बायको आणि ती… ‘व्हॅलेंटाइन डेची काय मस्त सुरुवात झाली आहे” असं कॅप्शन दिलं होतं. हाच व्हिडीओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला असून त्याबद्दल मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. तो व्हिडीओ शेअर करणं त्याला महागात पडलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

- Advertisement -

विवेकने विनाहेल्मेट बाईक चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. याशिवाय विनामास्क व्हिडीओ शेअर केल्यानं युवकांना चुकीचा संदेश देत आहेत, याप्रकरणी त्याला दंड आकारावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते डॉ. बीनू वर्गीस यांनी ट्विट केलं आहे.


हेही वाचा – करिना, सैफ दुसऱ्यांदा झाले आई बाबा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -