विवेक ओबेरॉय आणि ऋचा चड्ढाच्या Inside Edge Season 3चा ट्रेलर प्रदर्शित

Vivek Oberoi, Richa Chadha's series 'Inside Edge 3' Trailer out
विवेक ओबेरॉय आणि ऋचा चड्ढाच्या Inside Edge Season 3चा ट्रेलर प्रदर्शित

‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीझनच्या अभूतपूर्व यशानंतर ॲमेझोन प्राईमने काही महिन्यापूर्वी ‘इनसाइड एज सीझन ३’ची घोषणा केली होती. त्यानंतर आज, सोमवारी ‘इनसाइड एज सीझन ३’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एका शानदार हॅट्ट्रिकनंतर ॲमेझोन प्राईम व्हिडिओ आणि एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंटने विवेक ओबेरॉय आणि ऋचा चड्ढाच्या या दमदार सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

करण अंशुमन लिखित, निर्मित आणि कनिष्का शर्मा दिग्दर्शित ‘इनसाइड एज सीझन ३’ सीरिज ३ डिसेंबर २०२१ प्रदर्शित होणार आहे. जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये प्राईम मेंबर्स ‘इनसाइड एज सीझन ३’चे १० एपिसोड ३ डिसेंबरपासून पाहू शकतात.

‘इनसाइड एज सीझन ३’ सीरिजमध्ये विवेक ओबेरॉय आणि ऋचा चड्ढा व्यतिरिक्त आमिर बशीर, तनुज विरवानी, सयानी गुप्ता, सपना पब्बी अक्षय ओबेरॉय, सिद्धांत गुप्ता, अमित सियाल, जितीन गुलाटी, हिमांशी चौधरी, दलीप ताहिल, रेणुका शहाणे दिसणार आहेत.

२०१७मध्ये ‘इनसाइड एज’चा पहिला सीझन आला होता. पहिला सीझन खूप लोकप्रिय झाला होता. विवेक ओबेरॉयने ‘इनसाइड एज’च्या पहिल्या सीझनमधून ओटीटीवर पदार्पण केले होते. ‘इनसाइड एज’ची कहाणी एक काल्पनिक टी-२० सीरिज पावरप्ले लीगच्या फ्रेंचाइज मुंबई मेवरिक्सवर आधारित आहे. पहिल्या सीझनमधील कहाणी मॅच फिक्सिंगवर आधारित होता. दुसऱ्या सीरिजचा सीझन २०१९मध्ये आला होता. दोन्ही सीझनमध्ये १० एपिसोड होते. ४६वे इंटरनॅशन ऐमी अवॉडर्समध्ये बेस्ट ड्रामा सीरिजमध्ये ‘इनसाइ़ड एज’ नॉमिनेट झाली होती.


हेही वाचा – बॉलिवूडमध्ये अजय देवगणला झाली ३० वर्ष पूर्ण; काय म्हणाला ‘या’ प्रवासाबद्दल वाचा