‘द बिग बुल’साठी विवेक अभिषेकला म्हणाला All the Best!

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नानंतर विवेक ऑबेरॉय आणि अभिषेक बच्चनची मैत्री संपुष्टात आल्याची चर्चा रंगली होती. पण आता चित्रपटानिमित्त विवेकने अभिषेकला शुभेच्छा दिल्या आहेत.

Vivek Oberoi Wishes Abhishek Bachchan All The Best For The Upcoming Movie

अभिषेक बच्चनच्या आगामी ‘बिग बुल’ या चित्रपटासाठी विवेकने ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. हे ट्विट पाहून सिने रसिकांनी भूवया उंचावत आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका सोहळ्यात अभिषेकने विवेकला आलिंगण मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे बॉलीवूडचे अभिनेते विवेक ऑबेरॉय आणि अभिषेक बच्चन यांच्यात पुन्हा मैत्रीचे वारे वाहू लागले आहेत, असेच म्हणावे लागेल.

विवेकने केले हे ट्विट

ट्विटरवर ‘द बिग बुल’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत विवेकने ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, “‘द बिग बुल’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. चित्रपटाचा पोस्टर खरच खूप सुंदर दिसत आहे. कूकी गुलाटी, ज्यूनिअर बच्चन, अजय देवगन,आनंद पंडित, कुमार मंगत आणि संपूर्ण क्रूला ऑल द बेस्ट. आशा आहे की चित्रपट चांगले प्रदर्शन करेल. सर्वांना खूप सारं प्रेम.”

यापूर्वी दोघेही एकमेकांची भेट टाळत होते

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव अभिनेता विवेक ऑबेरॉयसोबत जोडण्यात आले होते. पण त्यांचे नातं खूप वेळ टिकलं नाही. त्यानंतर ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत विवाहबद्ध झाली. लग्नानंतर अभिषेक आणि विवेकमधील मैत्री संपुष्टात आल्याची चर्चा होती. एवढेच नाही तर कोणत्याही सोहळ्यात एकमेकांसमोर येणं दोघेही टाळत होते.

हेही वाचा – अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपटाचं बिगुल वाजलं!