घरमनोरंजनरोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' मध्ये विवेक ओबेरॉयची कडक एन्ट्री

रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ मध्ये विवेक ओबेरॉयची कडक एन्ट्री

Subscribe

रोहित शेट्टीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे. त्याने आपल्या सीरीजमधील अभिनेत्याचा पहिला लूक शेअर करत विवेकचे आपल्या सुपर फोर्स ग्रुपमध्ये स्वागत केले आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीची ओटीटी वरील पहिली वेब सीरिज ‘इंडियन पुलिस फोर्स’मध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टीच्या धमाकेदार एन्ट्रीनंतर आता अभिनेता विवेक ओबेरॉयचा असाच धमाकेदार लूक शेअर करण्यात आला आहे. या वेब सीरिजमध्ये विवेक ओबेरॉय एका सीनियर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या पोस्टमधील विवेकचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, यामध्ये विवेकने खाकी रंगाची पँन्ट आणि खाकी शर्ट त्यावर बुलेटप्रुफ जॅकेट घातले आहे. त्याच्या हातामध्ये बंदूक असून त्याचे लक्ष कोणावर तरी नेम लावताना दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

रोहित शेट्टीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे. त्याने आपल्या सीरीजमधील अभिनेत्याचा पहिला लूक शेअर करत विवेकचे आपल्या सुपर फोर्स ग्रुपमध्ये स्वागत केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

- Advertisement -

रोहित शेट्टीने ‘इंडियन पुलिस फोर्स’ कडून विवेक ओबेरॉचा पहिला लूक शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिले….”आमच्या ग्रुपच्या सर्वात अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा. तुमचे स्वागत आहे विवेक”

- Advertisement -

रोहित शेट्टीच्या पोस्टनंतर विवेक ओबेरॉयने सुद्धा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर रोहित शेट्टीचे आभार मानत म्हणाला की, ‘इंडियन पुलिस फोर्स’ आणि रोहित शेट्टीच्या ग्रुपमध्ये एक उच्च अधिकारी असण्याच्या नात्याने , या सर्वोत्तम भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यावाद”

अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार सीरिज

रोहित शेट्टीच्या सिंघम, सिंबा आणि सूर्यवंशी यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांचे बरेच चित्रपट पोलिसांवर आधारित असतात. आता त्यांची आगामी वेब सीरिज ‘इंडियन पुलिस फोर्स’ पोलिसांवर आधारित असणार आहे. या सीरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी झळकणार, विवेक ओबेरॉय सुद्धा दिसून येणार आहे. ही ८ भागांची सीरिज अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.

 

 

‘भूलभुलैया २’ पासून ते ‘जयेशभाई जोरदार’ पर्यंत असे मोठे चित्रपट मे महिन्यात होणार रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -