Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रिक्षा चालकाची मुलगी मान्या सिंह ठरली 'Miss India 2020' रनर अप

रिक्षा चालकाची मुलगी मान्या सिंह ठरली ‘Miss India 2020’ रनर अप

मान्या सिंहचा मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अगदी खडतर

Related Story

- Advertisement -

जिद्द असेल तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो हीच गोष्ट उत्तरप्रदेशच्या रिक्षा चालकाच्या मुलीने करून दाखवली. उत्तरप्रदेशची मान्या सिंह फेमिना मिस इंडिया 2020 रनर-अप ठरली. तिचा मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अगदी खडतर होता. भले मान्याला या फेमिना मिस इंडिया 2020 चा कितबा जिंकता आला नसला तरी तिच्या रनर अप पर्यंतच्या यशाचे सोशल मिडियावर कौतुक होत आहे. विशेष बाब म्हणजे ‘मिस वर्ल्ड २०१७’ ची विजेती मानुषी छिल्लर हिनेही मान्याच्या या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

१९ वर्षीय मान्या सिंहाचा मॉडेलिंग क्षेत्रातील इथपर्यंतचा प्रवास खडतर असून अनेक तरुणांसाठी प्रेरणा देणारा आहे. मान्या सिंहचे वडील हे एक साधारण रिक्षा चालक आहेत. मान्याने आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी खूप कष्ट केले. तिला कित्येक रात्री न खाता काढल्या, तरी तिची इच्छा शक्ती कायम होती. शेवटी तिच्या स्वप्नांना भरारी मिळालीच. तिने इंस्टाग्रामवर इथपर्यंतच्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे. यात तिने सांगितले की, डिग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांनी दागिने गहाण ठेवले. परिस्थिती इतकी बिकट होती की, एकामागोमाग एक अडचणी येतच होत्या. याच अडचणींचा सामना करताना धैर्य आणखी वाढत गेले. पैशाची नितांत गरज असल्याने भांडी घासण्यापासून ते कॉल सेंटरमध्ये ही कामं केलं. स्वप्न पूर्ण झाल्याचे श्रेय ती तिच्या आई-वडिल आणि भावाला देते.

- Advertisement -

घरातील बिकट परिस्थितीमुळे अगदी तरुण वयातच त्यावर घरच्या जबाबदाऱ्या आल्या. त्यामुळे तिला शाळेत जाणेही नशिबी आले नाही. मान्याने ज्या पद्धतीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चित केलेला प्रवास वाखाण्याजोगा आहे. तिचा खडतर प्रवास पाहून अनेकांनाच तिचा अभिमान आहे. एवढंच नाही तर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे तिने दाखवून दिलं आहे. ‘मिस वर्ल्ड २०१७’ ची विजेती मानुषी छिल्लर हिनेही मान्याच्या या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर तिच्याबद्दल लिहिताने मानुषीने लिहिले की, ‘काचेचं छप्पर अखेर तुटलं.’ या कार्यक्रमाला काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील हजेरी लावली.

काय आहे फेमिना मिस इंडिया
मिस इंडिया कींवा फेमिनी मिस इंडिया ही भारताची राष्ट्रीय सौंदर्यता स्पर्धा आहे. यात विजेता झाल्यावरच भारतीय सुंदरीला आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भाग घेता येतो. विजेतीला ब्रह्मांण्ड सुंदरी स्पर्धा, उपविजेतीला विश्व सुंदरी स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळते.

- Advertisement -

 

 

- Advertisement -