VootSeires: ‘ख्‍वाबों के परिंदे’मध्‍ये पाहा मैत्रीचा रोमांचपूर्ण प्रवास

'ख्‍वाबों के परिंदे' या सहा भागांच्‍या सिरीजमध्‍ये आशा नेगी, मृणाल दत्त, मानसी मोघे आणि तुषार शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत

VootSeires: See the thrilling journey of friendship in 'Khwabon Ke Parinde'
VootSeires: 'ख्‍वाबों के परिंदे'मध्‍ये पाहा मैत्रीचा रोमांचपूर्ण प्रवास

‘जिवलग मित्र सोबत असतो तेव्‍हा कधीच कोणत्‍याच गोष्‍टीची भिती वाटत नाही’. कधी काय घडेल सांगता येत नाही. जीवनातील प्रवास कधी-कधी खडतर असू शकतो, पण मित्रांच्‍या मदतीने या खडतर प्रवासामधून मार्ग काढणे सोपे जाते. सध्‍याच्‍या काळात जगभरात अनिश्चिततेचे वातावरण असताना मित्रांसोबत व्हिडिओ कॉलवर तुम्‍हाला वाटणारी भिती सांगितली आणि गप्पागोष्टी केल्या तर काहीसे हायसे वाटते. तपस्‍वी मेहता दिग्‍दर्शित वूटवरील नवीन ओरिजिनल सिरीज ‘ख्‍वाबों के परिंदे’मध्‍ये आशा नेगी, मृणाल दत्त, मानसी मोघे आणि तुषार शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. ही सिरीज मैत्री व आशेला दाखवते. ही बहुप्रतिक्षित ड्रामा सिरीज व्‍यासपीठावर १४ जून २०२१ पासून पाहायला मिळणार आहे. ऑस्‍ट्रेलियामधील नयनरम्‍य ठिकाणी चित्रित करण्‍यात आलेली सिरीज ‘ख्‍वाबों के परिंदे’ तीन प्रमुख पात्र – बिंदीया, दिक्षित व मेघा यांच्‍या जीवनांच्‍या अवतीभोवती फिरते. युनिव्‍हर्सिटी ऑफ मेलबर्नमधून पदवी शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर अतिउत्‍साही बिंदीया तिच्‍या दोन सर्वात विश्वसनीय मित्र दिक्षित व मेघाला तिच्‍यासोबत मेलबर्नपासून पर्थपर्यंत महत्त्वाकांक्षी व विलक्षण रोड ट्रिपवर घेऊन जाते. त्‍यांच्‍या प्रवासादरम्‍यान त्या विलक्षण, विनोदी व प्रबळ सहयात्री आकाशला भेटतात. ही ट्रिप प्रत्‍येकासाठी खूपच खास असते, कारण या प्रवासामधून त्‍यांना स्‍वत:चा पुनर्शोध घेण्‍याची आणि एकमेकांचे प्रामाणिक सहयोगी बनण्‍याची संधी मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by MsNegi (@ashanegi)

या सिरीजबाबत मत व्‍यक्‍त करत आशा नेगी म्‍हणाली, ”मी टेलिव्हिजनवर साकारलेल्‍या भूमिकांपेक्षा बिंदीयाची भूमिका पूर्णत: वेगळी आहे. मी पटकथा वाचली तेव्‍हा मला समजले की, माझ्यासाठी ही भूमिका आव्‍हानात्‍मक आहे. पण दिग्‍दर्शक तपस्‍वी यांचे आभार, त्‍यांच्‍यामुळेच हा प्रवास अत्‍यंत सुलभ राहिला आहे आणि त्‍यांनी मला बिंदीयाच्‍या भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यामध्‍ये मदत केली.” ती पुढे म्‍हणाली, ”’ख्‍वाबों के परिंदे’ जीवनाबाबत असल्‍यामुळे ही सिरीज आपल्‍या सर्वांशी अत्‍यंत संबंधित आहे. आपले मित्र जीवनाच्‍या सर्वात खडतर टप्‍प्‍यांमधून बाहेर पडण्‍यामध्‍ये कशाप्रकारे मदत करतात आणि आजीवन अशी मैत्री टिकून ठेवण्‍याचे महत्त्व या सिरीजमधून पाहायला मिळते. माझ्या मित्रमैत्रिणींनी मला माझ्यामधील सर्वोत्तम गुणांना बाहेर आणण्‍यामध्‍ये, तसेच प्रगतीपथावर आणण्‍यामध्‍ये मदत केली आहे. तसेच माझे सह-कलाकार मृणाल, मानसी व तुषार हे देखील माझे चांगले मित्र बनले आहेत, ज्‍यांच्‍यासोबत मी आजीवन मैत्री ठेवेन.”

‘ख्‍वाबों के परिंदे’ या सहा भागांच्‍या सिरीजमध्‍ये आशा नेगी, मृणाल दत्त, मानसी मोघे आणि तुषार शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. मेलबर्न ते पर्थपर्यंतची रोड ट्रिप कशाप्रकारे बिंदीया, दिक्षित, मेघा व तुषारच्‍या जीवनांमध्‍ये बदल घडवून आणते आणि ते कशाप्रकारे त्‍यांच्‍या भावना व्‍यक्‍त करतात, वेदनांना भरून काढतात, प्रेमात पडतात आणि त्‍यांच्‍या सर्वात भयंकर भितीचे शमन करतात हे या सिरीजमध्‍ये पाहायला मिळणार आहे.पाहा ‘ख्‍याबों के परिंदे’ १४ जून २०२१ पासून फक्‍त वूटवर


हे हि वाचा – ‘महाभारत’ सिनेमात रिया झळकणार ‘द्रौपदीच्या’ भूमिकेत ?