Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रशियाच्या रस्त्यावर तापसीची भटकंती..साडी,शूज,गॉगल्समध्ये तापसीचा सफरनामा

रशियाच्या रस्त्यावर तापसीची भटकंती..साडी,शूज,गॉगल्समध्ये तापसीचा सफरनामा

या पेहरावात तापसी उनाडपणे सेंट पीटर्सबर्गमध्ये फिरताना दिसतेय.“डीनरला लेट होतंय..पळा…” अशा आशयाचं कॅप्शन देत तापसी ट्रीपची संपुर्ण मजा लुटत आहे

Related Story

- Advertisement -

कलाकारांना त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये क्वचितच त्यांची हौस पुर्ण करण्याचा मनमोकळेपणाने फिरण्याचा आनंद घेता येतो. पण सध्या बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू रशियाच्या भटकंतीमध्ये भारीच गूंग झाल्याचे दिसतेय. ते सुद्दा चक्क साडी नेसून तापसी रशियातील रस्तावर मौज करत आहेत. तापसीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या तिच्या रशिया ट्रीपचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात तापसी बहिणीसोबत काही दिवसांपासून व्हॅकेशन एंजॉय करत आहे. शूटिंगची धावपळ आणि व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत अभिनेत्री तापसी पन्नू अनेकदा वेगवेगळ्या देशांमध्ये भटकंती करताना दिसते.यादरम्यान तापसी रशियातील रत्यावर कधी सायकल चालवतांना दिसत आहे तर कधी रशियातील कॉफी टपरीवर कॉफीचा स्वाद घेत आहे. परदेशात असताना सुद्दा तापसीने भारतीय पोषाखाला पसंती दिल्याचे तिच्या फोटोतून दिसतेय. तापसीने पांढऱ्या रंगाची कॉटन साडी परिधान कोलीये तसेच यावर तिने शूज आणि गॉगल्स लावला आहे तापसीचा हा हटके लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

- Advertisement -

या पेहरावात तापसी उनाडपणे सेंट पीटर्सबर्गमध्ये फिरताना दिसतेय.“डीनरला लेट होतंय..पळा…” अशा आशयाचं कॅप्शन देत तापसी ट्रीपची संपुर्ण मजा लुटत आहे. तसेच तापसीच्या या फोटोवर चाहत्यांसहीत अनेक कलाकारांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास तापसी ‘रश्मी रॉकेट’, ‘लूप लपेटा’ या सिनेमांमध्ये झळकणार आहे. तसेच लवकरच तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर २ जुलैला रिलिज होणार आहे


हे हि वाचा – तारक मेहता का उल्टा चष्मा:दिव्यांका त्रिपाठीने दयाबेनची भूमिका करण्यास दिला नकार?


- Advertisement -

 

- Advertisement -