War-2 चित्रपट ‘या’ तारखेला होणार रिलीज

'वॉर' या सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे वॉर - 2 या सिनेमाचे दिग्दर्शन करत नाही, तर अयान मुखर्जी हे वॉर - 2 या सिनेमाचे दिग्दर्शक करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) यांचा वॉर -2 (War-2) हा चित्रपट खूप चर्चेत आला आहे. वॉर – २ या चित्रपटात ऋतिक रोशन यांच्यासबोत दाक्षिणात्य अभिनेता जूनियर एनटीआर (Jr. NTR) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ऋतिक आणि जूनियर एनटीआर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी (Ayan Mukerji) करणार असून आता वॉर – 2 हा चित्रपटच्या रिलीज डेटसंदर्भातील माहिती समोर आली आहे.

दरम्यान, निर्मात्यांनी अद्यापही वॉर – 2 या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटाबद्दल त्यांच्या चहात्यांना संकेत देत आहेत. या दोन्ही स्टार्सनी नुकतेच ट्विटरवर वॉर 2 मध्ये एकत्र काम करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली होती. ज्युनियर एनटीआरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ऋतिक रोशन म्हणाला की, ‘रणांगण तुमची वाट पाहत आहे’. यावर प्रतिक्रिया देताना ज्युनियर एनटीआर म्हणाले की, लवकरच सेटवर जॉईन होईल. हे ऐकल्यानंतर दोघांचे चाहते खूप खुश दिसत आहेत.

 

या सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, वॉर – 2  हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ पर्यंत चित्रपटगृहात  रिलीज होऊ शकतो. या चित्रपटाचे शुटिंग या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. वॉर – 2 मध्ये एनटीआर यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात  दिसणार आहे. हा एक मोठा अॅक्शन साहसी चित्रपट असेल. या चित्रपटात ऋतिक आणि एनटीआर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचीही चर्चा आहे. आणि हे दोन्ही स्टार्स पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
‘वॉर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे वॉर – 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन करत नाही, तर अयान मुखर्जी हे वॉर – 2 या चित्रपटाचे दिग्दर्शक करणार आहेत. सिद्धार्थ आनंद हे ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत फायटर या चित्रपट पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. यानंतर सिद्धार्थ हे शाहरुख खान आणि सलमान खान यांचा पठाण विरुद्ध टायगर सिनेमा पूर्ण करणार आहेत.
वर्कफ्रंट, वॉर – 2 व्यतिरिक्त ऋतिक रोशन फायटरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण दिसणार आहे. वॉर २०१९ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात ऋतिक रोशनसोबत टायगर श्रॉफ दिसला होता.