घरमनोरंजनबॉक्स ऑफिसवर 'वॉर'ची बक्कळ कमाई; रचला विक्रम!

बॉक्स ऑफिसवर ‘वॉर’ची बक्कळ कमाई; रचला विक्रम!

Subscribe

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफची जोडीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर या दोघांचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी वॉरने कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. वॉरने बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली आणि २०१९ मधील पहिल्या दिवशी सर्वाधीक कमाई करणारा वॉर हा चित्रपट ठरला.

- Advertisement -

पहिल्या दिवशी वॉरने ५३.३५ कोटी कमाई केली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्शने ट्वीट करत ही माहिती दिली. ‘वॉर’च्या आधी अमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ ने सर्वात मोठी ओपनिंग मिळवण्याचा मान मिळवला होता. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ ने पहिल्या दिवशी ५०.७५ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता वॉरने ५३.३५ कोटींची कमाई करत ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ला मागे टाकले आहे.

- Advertisement -

वॉर हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगु या तीन भाषांमध्ये चार हजार चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. केवळ भारतात नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये देखील वॉर सर्वाधीक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. वॉर मध्ये पहिल्यांदाच अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ ही गुरू -शिष्याची जोडी एकत्र झळकली. या चित्रपटात थरारक अ‌ॅक्शन्स आणि हृतिक – टायगरची डान्सची जुगलबंदी प्रेक्षकांच लक्ष वेधून घेते.

अॅडव्हान्स बुकिंगमध्येच रचला इतिहास…

गेल्या बऱ्याच दिवसांपासून हृतिक आणि टायगरच्या ‘वॉर’ची चर्चा सुरू होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यावर प्री – बुकिंगमध्येच या चित्रपटाने ३१ ते ३२ कोटींची कमाई केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -