घरताज्या घडामोडीकंगनाला HCने सुनावले, पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावणार

कंगनाला HCने सुनावले, पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावणार

Subscribe

कंगना सध्या देश विदेशातील वेगवेगळ्या भागात कामानिमित्त राहत असल्याने ती सुनावणीसाठी कोर्टात हजर राहू शकत नाही, असे तिने स्पष्ट केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. तिच्या सिनेमांविषयी देखील ती अनेक वेळा चर्चेचा विषय ठरली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (javed akhtar)  यांनी कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सुनावणी दरम्यान कंगनाला हायकोर्टाने चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहणाऱ्या कंगनावर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली असून पुढील सुनावणीसाठी गैरहजर राहिल्यास कंगनाला अटकेचे वॉरंट बजावण्यात येईल, असे हायकोर्टाने म्हटले आहे. (Warrant will be served in case of kangana ranaut absence at the next hearing javed akhtar defamation case -HC ) या प्रकरणातील पुढील सुनावणी १ सप्टेंबर रोजी होणार.

कंगनाने आपल्या वकिलांच्या माध्यमातून कोर्टात याचिका दाखल करत जावेद अख्तरच्या प्रकरणा कोर्टात हाजीर होण्यापासून कायमची सूट मागितली होती. मात्र कोर्टाने कंगानाची ही याचिका फेटाळली होती. कंगना सध्या देश विदेशातील वेगवेगळ्या भागात कामानिमित्त राहत असल्याने ती सुनावणीसाठी कोर्टात हजर राहू शकत नाही, असे तिने स्पष्ट केले आहे. कोर्टाच्या आजच्या सुनावणीनंतर कंगना पुढील सुनावणीसाठी हजर राहणार का पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

कंगनाने गेल्या वर्षी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. जावेद अख्तर बॉलिवूडमध्ये गटबाजी करतात असा आरोप कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर केला होता. त्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात हायकोर्टोत मानहानीचा खटला दाखल केला होता.


हेही वाचा – उमेश कामत आणि मुक्ता बर्वेच ‘61 मिनिट्स’ थरारनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -