घरमनोरंजनCinema Lovers Day निमित्ताने फक्त 99 रुपयांमध्ये पाहा कोणताही चित्रपट

Cinema Lovers Day निमित्ताने फक्त 99 रुपयांमध्ये पाहा कोणताही चित्रपट

Subscribe

जर तुम्हाला देखील चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायला आवडत असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. येत्या 20 जानेवारी रोजी फक्त 99 रुपयांध्ये तुम्ही हवा तो चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहू शकता. खरंतर, 20 जानेवारी रोजी  भारतातील काही निवडक शहरांमध्ये Cinema Lovers Day साजरा करण्यात येणार आहे. त्याच निमित्ताने केवळ 99 रुपयांमध्ये तुम्ही हवा तो चित्रपट पाहू शकता.

गेल्या वर्षी पीवीआर, आईनॉक्स, कार्निवल, सिनेपॉलिस, मिराज, डिलाइट या चित्रपट कंपन्यांनी Cinema Lovers Day साजरा होता. त्यावेळी तिकीटाची किंमत 75 रुपये होती. यंदा या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

Cinema Lovers Day निमित्ताने पाहू शकता ‘हे’ चित्रपट
या दिवशी चित्रपटगृहात तुम्ही वीरासु, दृश्यम 2, अवतार 2 यांसारखे चित्रपट पाहू शकता. तिकिट ऑनलाईन बुक करण्यासाठी आईनॉक्ससह इतर कंपन्यांनी खास व्यवस्था केली आहे. तसेच बॉक्स ऑफिस काऊंटरवर देखील तिकिटांची विक्री करण्यात येणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

मेहंदी सोहळ्यात बॉलिवूड गाण्यावर थिरकली अंबानींची धाकटी सून; व्हिडीओ व्हायरल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -