15 मे पासून पाहा Sony BBC अर्थची उन्हाळी भटकंती

सोनी बीबीसी अर्थ वाहिनी आपल्या कार्यक्रमांच्या नव्या मनोवेधक मालिकेद्वारे आपल्या प्रेक्षकांसाठी नव्या ठिकाणांच्या भटकंतीची व नव्या संस्कृतींच्या अनुभवांची मेजवानी घेऊन आली आहे. सुप्रसिद्ध शेफ रिक स्टेनसोबत तोंडाला पाणी आणणाऱ्या खानपानयात्रेपासून ते लोनली प्लॅनेटच्या इअर ऑफ अॅडव्हेंचरमधले चित्तथरारक अनुभव असोत, या वाहिनीवर प्रत्येकाच्याच आवडीनिवडीला साजेसे काही ना काही जरूर असणार आहे. प्रेक्षकांना घरच्या घरीच आरामात बसून प्रवास, खाद्यसंस्कृती आणि लाइफस्टाइलविषयीच्या कार्यक्रमांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या अनुभवांचा आनंद घेता येणार आहे.

महिन्याची सुरुवातच रिक स्टेन्स स्पेन आणि रिक स्टेन्स टेस्ट ऑफ शांघाई या उत्साहाने शिगोशिग भरलेल्या कार्यक्रमांनी झाली. या प्रेक्षकांना रिक स्टेनच्या साथीने अखंड स्पेन पायाखाली घालण्याची आणि स्पॅनिश पाककलेच्या खऱ्याखुऱ्या आत्म्याचा शोध घेण्याची संधी मिळाली व शांघाईमधील खाद्यसंस्कृतीची व्हर्च्युअल साहसी सफर करता आली. आगामी कार्यक्रमांमध्ये – ‘लोनली प्लॅनेट स्ट्रेसबस्टर’, ‘लोनली प्लॅनेट: १००० अल्टिमेट एक्स्पीरियन्सेस’ आणि ‘लोनली प्लॅनेट: इअर ऑफ अॅडव्हेंचर’ यांचा समावेश असणार आहे. लोनली प्लॅनेट स्ट्रेसबस्टरमध्ये अशियामधील भटकंतीमधून मनाची मरगळ दूर करत ताजेतवाने करणाऱ्या, स्वत:शी नव्याने भेट घालून देणाऱ्या काही अनोख्या वाटा शोधण्याची संधी मिळणार आहे.

तर ‘लोनली प्लॅनेट: १००० अल्टिमेट एक्स्पीरियन्सेस’ मध्ये प्रेक्षकांना अवघ्या जगाची सैर घडवली जाणार आहे, ज्यात त्यांना थक्क करून टाकणारी पुरातन स्थळे, जिभल्या चाटत रहावे असे उत्तमोत्तम स्ट्रीट फूड आणि अशा कितीतरी गोष्टींचा अनुभव घेता येणार आहे. लोनली प्लॅनेटच्या या अनुभवांना परिपूर्णता देणाऱ्या इअर ऑफ अॅडव्हेंचरमध्ये अॅडव्हेंचरर बेन फोगल यूएस, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये आव्हानांच्या मालिकांना सामोरा जात असताना प्रेक्षकांना या पृथ्वीग्रहावरील काही सर्वाधिक असामान्य आणि अनपेक्षित अशा जागा पाहता येणार आहेत.

याखेरीज या वाहिनीवर ‘न्यूयॉर्क: अमेरिकाज बिझिएस्ट सिटी’ या कार्यक्रमाचा प्रिमियर होणार आहे. या कार्यक्रमामध्ये न्यू यॉर्क शहराचे व्यापारी, आर्थिक आणि सांस्कृतिक हृदय धडधडते राखणाऱ्या गुंतागूंतीच्या वाहतूक यंत्रणा, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांचा धांडोळा घेतला जाणार आहे.

मनोरंजक कार्यक्रमांच्या या मालिकेसोबत घरच्या घरीच, आपल्या काऊचवर आरामात बसून जगाची भटकंती करा. १५ मे पासून दुपारी १२ आणि रात्री ८ या वेळेत प्लॅनेट स्ट्रेसबस्टर, लोनली प्लॅनेट: १००० अल्टिमेट एक्सपीरियन्सेस आणि लोनली प्लॅनेट इअर ऑफ अॅडव्हेंचर हे कार्यक्रम पहा तर २९ मे पासून दुपारी २ व रात्री १० वाजता आणि अखेरीस रात्री १० वाजता न्यूयॉर्क: अमेरिकाज बिझिएस्ट सिटी’च्या साथीने अमेरिकेच्या सर्वाधिक गजबजलेल्या शहरातील वर्दळ आणि धावपळ अनुभवा.


हेही वाचा :

मनोज वाजपेयीचा ओरिजनल फिल्म ‘सिर्फ एक बंदा काफी है’चा ट्रेलर प्रदर्शित