घरमनोरंजनvideo : अल्लू अर्जुनने 'पुष्पा द राइज'च्या सेटवरील क्रू मेंबर्सना केली 'ही'...

video : अल्लू अर्जुनने ‘पुष्पा द राइज’च्या सेटवरील क्रू मेंबर्सना केली ‘ही’ खास विनंती

Subscribe

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट येत्या १७ डिसेंबरला रिलीज होणार आहे. दरम्यान रविवारी mythri movie makersने त्यांच्या ट्वीटर हँडवरून या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन चित्रपटाच्या सेटवरील क्रू मेंबर्सना एक आग्रहाची विनंती करताना दिसतोय.

अल्लू अर्जुन क्रू मेंबर्सना केली ही विनंती

Mythri Movie Makers ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या वतीने क्रू मेंबर्सना एक विनंती करताना दिसतोय. यात तो म्हणतो की, “मला माझ्या बाजूने एक छोटीशी विनंती करावीशी वाटते की, ‘आपण याठिकाणी खूप दिवसांपासून शूटिंग करत आहोत मात्र आपण सर्वांनीच प्लास्टिकच्या बाटल्या, कप आणि कागदं डस्टबिनमध्ये फेकले आहेत की नाही याची खात्री करुन घ्यावी.”

- Advertisement -

तो पुढे असेही म्हणाला की, “आपण आलो तेव्हा जशी स्वच्छ होती तशीच स्वच्छता येथून जाताना दिसली पाहिजे.” हाच व्हिडिओ पुढे चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान देखील दाखवण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओमध्ये, चित्रपट दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर देखील चित्रपटाचे अॅक्शन सीन स्पष्ट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून या चित्रपटासाठी सर्व टीमने खूप मेहनत घेत सर्वोत्तम कामगिरी केल्याचे म्हटले जातेय.

- Advertisement -

सोमवारी रिलीज होणार चित्रपटाचा ट्रेलर

‘पुष्पा द राइज’ चित्रपट निर्मात्यांनी शनिवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ लिंक शेअर करत चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित होणार हे जाहीर केले. अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन वेगळ्या अंदाजात दिसत आहे. हा चित्रपट दोन पार्टमध्ये बनवण्यात आला आहे.

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल अभिनीत हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट मुत्तमशेट्टी मीडिया आणि mythri movie makersच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट दोन पार्टमध्ये बनवण्यात आला आहे. पहिला पार्ट या वर्षी तर दुसरा पार्ट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तेलुगू भाषेत तयार करण्यात आलेला हा चित्रपट तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत १७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -