Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ''आपल्यातसुद्धा असे राक्षस आहेत'', आर .माधवनने नागरिकांना केले अलर्ट

”आपल्यातसुद्धा असे राक्षस आहेत”, आर .माधवनने नागरिकांना केले अलर्ट

कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. काही जण सोशल मिडियावर औषधांच्या उपलब्धतेची माहिती शेअर करत मदतीचा हात पुढे केला करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काहीजण याच औषधांचा काळाबाजार करत आहेत.

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढा देत आहे. कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच कोरोना रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्यांचे नातेवाईक धडपड करताना दिसत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. काही जण सोशल मिडियावर औषधांच्या उपलब्धतेची माहिती शेअर करत मदतीचा हात पुढे केला करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काहीजण याच औषधांचा काळाबाजार करत आहेत. औषधांचा काळाबाजार करणाऱ्या लाोकांवर बॉलिवूड अभिनेता आर. माधवन चांगलाच संतप्त झाला आहे. सोशल मिडियाद्वारे त्याने केलेल्या एका पोस्ट मधून अशा लोकांची चांगलीच उचलबांगडी त्याने केली आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये आर माधवनने एक फोटो शेअर करत, ”मला देखील हे आलं आहे. कृपया सतर्क रहा. आपल्यातसुद्धा असे राक्षस आहेत” असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

तर फोटोत म्हटलं आहे की, ”फ्रॉड अलर्ट.. मिस्टर अजय अग्रवाल ३ हजार रुपयात रेमडिसिवीर उपलब्ध करुन देत आहेत. ते तुमच्याकडून IMPSच्या माध्यमातून पैसे मागतील. तीने तासात भारतात कुठेही औषध उपलब्ध करुन देतील असे सांगतिल. मात्र त्यानंतर ते फोन उचलणार नाहीत. अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान…हा माणूस फसवणूक करणारा आहे…” ही पोस्ट शेअर करत माधवनने लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्व विदारक परिस्थितीमध्ये ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा काळाबाजर मोठ्या प्रमाणावर सुरु झाला आहे. या आवश्यक गोष्टी दुप्पच किंमतीमध्ये गरजू लोकांना विकल्या जात आहेत. ही अशी कामे करणाऱ्या लोकांवर आर. माधवनने कमालीचा संताप व्यक्त केला आहे.


- Advertisement -

हे वाचा-   कंगना ‘टिकू वेड्स शेरु’ चित्रपटातून करणार डिजीटल विश्वात पदार्पण

- Advertisement -