घरमनोरंजनकरीना कपूर : आम्ही कपूर कॅमेऱ्यासमोर दिलखुलास असतो

करीना कपूर : आम्ही कपूर कॅमेऱ्यासमोर दिलखुलास असतो

Subscribe

हर्षदा वेदपाठक

करीना कपूर खान आता आपल्या ओटीटी पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. सुजय घोषच्या यांच्या जाने जान या वेब सिरीजद्वारे, माया डीसुझाच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कायगो हॅगॅशिनोच्या द डीव्होशन सस्पेक्ट एक्स या गाजलेल्या कादंबरीवर हा आधारीत चित्रपट आहे. २१ सप्टेंबर रोजी करीनाचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. महानगरने या निमित्ताने तिची घेतलेली खास मुलाखत.

- Advertisement -

ओटीटी वर पदार्पण करण्याचा निर्णय का घेतलास?

मला या आधीही ओटीटीसाठी विचारणा होत होती. पण यापूर्वी माझ्यापुढे आलेली कोणतीही पटकथा मला ओटीटीवर काम सुरु करण्यायोग्य वाटली नाही. सुजोयला ही गोष्ट नेटफ्लिक्ससाठी करायची होती. मला ही पटकथा प्रचंड आवडली. मला नेहमीच एखाद्या थ्रिलरमध्ये काम करण्याची इच्छा होती आणि जाने जान हा विषय सुद्धा मला आवडेल असा होता.

- Advertisement -

आज तुझा पहिला ओटीटी चित्रपट प्रदर्शित होत आहे तुझ्या काय भावना आहेत?

सुजयकडे हा चित्रपट दहा वर्षांपासून आहे, पण त्यासाठी त्याचा योग्य कलाकारांचा शोध पूर्ण होत नसल्याने तो विषय मागे पडला. मात्र आता सगळे काही जुळून आल्याचा मला आनंद आहे. सुजयची कहानी मधील कामगिरी पाहील्यानंतर मला त्याच्याबरोबर एक थ्रिलर करण्याची नेहमीच इच्छा होती. अगदी अशा वातावरणात आमच्यासाठी हा एकदम योग्य असा थ्रिलर होता.

ओटीटी माध्यमाची खासियत काय सांगशील ?

चित्रपट आणि ओटीटी हि दोन वेगळी माध्यमे आहेत. ओटीटीसाठी तुम्हाला जास्त तयारी करावी लागते. हे मी खूप जवळून पाहीले आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारे काम करावे लागते. तुम्हाला जबरदस्त अभिनेते आणि उत्कृष्ठ पटकथेची आवश्यकता असते. एक कलाकार म्हणून आम्हाला माहित असते की आमचा अभिनय चांगलाच झाला पाहीजे. लोकांनी माझे काम पहावे आणि त्याला दाद द्यावी, अशी माझी इच्छा आहे.

प्रत्यक्ष जिवनात दोन मुलांचा आई असल्यामुळे, पडद्यावर आईची भूमिका साकारताना मदत झाली का?

नक्कीच.. मी याआधी रावन मध्येही आईची भूमिका साकारली होती. खरे तर मी माझ्या वैयक्तीक आयुष्याला माझ्या कामाशी जोडत नाही, ते खूप वेगळे आहे. एक आहे, कदाचित प्रत्यक्ष आई असल्यामुळे एका आईच्या काही सवयी सहाजिकच उचलल्या गेल्या असतील, पण आई म्हणून जे मी खऱ्या आयुष्यात करते ते जाणीवपूर्वक उचलण्याचा माझा प्रयत्न नसतो. अजाणतेपणी ते माझ्याकडून घडत असेल.

सैफ तुला नेहमीच प्रोत्साहन देत असतो, आता तू ओटीटीवर पदार्पण करत आहेस, याचे श्रेय त्याला देतेस का?

सैफ मला नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो हे खरे आहे. मला सुद्धा स्वतः मधल्या वेगवेगळ्या पैलूंना आवाहन देऊन पहायचे आहे. सैफू मला खूप आधीपासून ओटीटी मध्ये काम करण्यासाठी सुचवत होता. पण मीच वेळ घेत होती. त्याने काही वेब सिरीज मध्ये काम केले आहे. त्याला तो अनुभव आवडला होता.

तू नेहमीच एवढी मिठ्ठास कशी राहू शकतेस, का हे सगळे तुझ्यात कपूर जिन्समुळे आले आहे?

आम्हाला आमच्या कामातून प्रचंड आनंद मिळतो, खास करुन इतर कशापेक्षाही जेंव्हा आम्ही कॅमेऱ्यासमोर काम करत असतो तेव्हा ते अतिशय आनंददायक असते. आणि आम्हाला यातून समाधान आणि आनंद मिळतो.

तुझ्या पहिल्यावहील्या निर्मितीबद्दल काय सांगशील?

मी एक छोटासा चित्रपट निर्मिला आहे, जो ब्रिटीश चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार आहे. खरे तर तो एक इंग्रजी भाषेतला चित्रपट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे. हा व्यावसायिक चित्रपट नसला, तरी हंसल मेहता यांचा चित्रपट आहे. हा ऐक असा चित्रपटाचा प्रकार आहे, जो मला करुन पहायचा आहे.

तुला हॉलीवूडमध्ये जाण्याची इच्छा आहे का?

मी, सध्या इथेच कामात खूप व्यस्त असल्यामुळे मला तसा कोणताच मोह नाही. त्याचबरोबर मी दोन मुलांची आई आहे, त्यांनाही मला वेळ द्यावा लागतो. माझी मुलं अजून खूपच लहान आहेत.

एवढ्या वर्षांत चित्रपट निवडण्याचे तुझे निकष बदलले आहेत का?

कोणीही एकसारखेच चित्रपट परत परत करु शकत नाही. मला वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे हंसल (मेहता) बरोबर एक चित्रपट आणि सुजोय बरोबर एक चित्रपट करण्यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मी व्यावसायिक चित्रपट करत राहीन. पण माझ्यात असाही एक कलाकार आहे, ज्याला वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करायचे आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -