Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन MX प्लेअरवर फुकटात बघता येणार 'गंदी बात'

MX प्लेअरवर फुकटात बघता येणार ‘गंदी बात’

Subscribe

MX व्हिडिओ प्लेअरवर इंटरनेटवरील वेब मालिकांमधील गाजलेली मालिका गंदी बात आता फुकटात बघायला मिळणार आहे. हा प्लेअर सोशल मीडिया (फेसबुक) वर उपलब्ध आहे.

मनोरंजनाच्या क्षेत्रात वेब मालिका सध्या बहुचर्चेत आहेत. वेब मालिकांना सेंसॉर बोर्ड नसल्यामुळे या मालिका सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय बनत चालल्या आहेत. या वेब मालिका मोबाईल बघणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने MX प्लेअरने बहूचर्चीत गंदी बात ही वेब मालिका लोकांना उपलब्ध करून दिली आहे. सध्या टीव्ही ऐवजी मोबाईलवर चित्रपट बघितले जातात. यासाठी मोबाईल टीव्ही ही संकल्पाना रावबली जात आहे. याच तत्वावर MX प्लेअरने ही वेब मालिकेची संकल्पना राबवली आहे. वेब मालिकेचा कंटेंट या प्लेअरवर उपलब्ध करण्यात आला आहे. फेसबुकवर ही मालिका टाकल्यामुळे याला लोकही चांगला प्रतिसाद दिला आहे.

mx player streaming gandi baat free
फेसबुक वरील MX प्लेअर

- Advertisement -

व्हिडिओ बघण्यासाठी देशात सर्वाधिक वापरले जाणारे ‘एमएक्स प्लेअर’ वेब मालिका रसिकांसाठी यापुढेही नवीन मालिका घेऊन येणार आहे. प्रेक्षकांना त्यांच्या पसंतीचे मनोरंजन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले असल्याचे कंपनीने सांगतिले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -