आरआरआर, पंचायत 2, एस्केप लाइव्हसह अनेक web Series आणि Films चा ‘या’ आठवड्यात OTT वर धमाका

web series ott films this week rrr pachayat 2 escaype live sara 3 little italy draft day tasalli se on zee5 prime video disney plus hotsta
आरआरआर, पंचायत 2, एस्केप लाइव्ह... या आठवड्यात OTT वर web Series आणि Films चा धमाका

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा धाकड आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 2 या आठवड्यात चित्रपट गृहात दाखल होणार आहेत. त्याचवेळी आता KGF Chapter 2 अजूनही थिएटरमध्ये आपली ताकद दाखवत आहे. दरम्यान बॉक्स ऑफिसवर चित्रपट प्रदर्शनाचा धडाका सुरु असताना आता OTT प्लॅटफॉर्मवरही या आठवड्यात मनोरंजनाचा धमाका होणार आहे. यात पंचायत सारख्या यशस्वी वेबसिरीजचा दुसरा सिजन आणि एसएस राजमौली यांच्या RRR सह अनेक मनोरंजनात्मक वेबसिरिज आणि चित्रपट विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.

यात तरुण दुडेजा दिग्दर्शित तसल्ली से ही शॉर्ट फिल्म 17 मे रोजी Amazon Mini-TV वर येत आहे. या फिल्ममध्ये नकुल मेहता आणि नवीन कस्तुरिया मुख्य भूमिकेत आहेत. ही शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी युजर्सना Amazon च्या शॉपिंग वेबसाइटवर जावे लागेल. या चित्रपटातील नकुल मेहताच्या व्यक्तिरेखेचे नाव सोमेश आहे, तर नवीनच्या पात्राचे नाव रंजन आहे. दोघे मित्र आहेत. सोशल मीडियावर भांडण झाल्यानंतर त्यांची मैत्री तुटते आणि त्यानंतर 12 वर्षांनी दोघे पुन्हा कसे एकत्र भेटतात याची कहाणी दाखवली आहे. हू किल्ड साराचा तिसरा आणि शेवटचा सीझन 18 मे रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. ही एक सस्पेन्स-थ्रिलर वेब सिरीज आहे.

20 मे रोजी OTT वर धमाका

या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक RRR चा वर्ल्ड प्रीमियर ZEE5 वर होत आहे. हा चित्रपट इंग्रजी सबटायटल्ससह तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये सध्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. मात्र हिंदीत पाहण्यासाठी आता वाट पहावी लागेल. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटातएनटीआर जूनियर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत, तर अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी कॅमिओ केला आहे. हा चित्रपट 20 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि हिंदी पट्ट्यात 250 कोटींहून अधिक कमाई केली.

डिस्ने प्लस हॉटस्टारवर थ्रिलर सिरीज एस्केप लाईव्ह येत आहे. एस्केप लाईव्ह ही जया मिश्रा आणि सिद्धार्थ कुमार तिवारी यांनी लिहिलेली काल्पनिक कथा आहे. कथेमध्ये कंटेंट क्रिएटर्सचा एक समूह आहे, ज्यांचे मार्ग भिन्न आहेत, परंतु ध्येय एक आहे – व्हायरल कंटेंट तयार करणे. सिद्धार्थ कुमार तिवारी यांच्या वन लाइफ स्टुडिओने याची निर्मिती केली आहे. ही एक एपिसोडिक सिरीज आहे, ज्यामध्ये एकूण 9 एपिसोड्स स्ट्रीम केले जातील. या सिरीजमध्.े सिद्धार्थ, जावेद जाफरी, श्वेता त्रिपाठी शर्मा, स्वस्तिका मुखर्जी, प्लाबिता बोरठाकूर, वालुचा डिसूझा, ऋत्विक साहोर, सुमेध मुदगलकर, गीतिका विद, ओहल्याण, व्ही. जगजीत संधू, रोहित चंदेल आणि बाल कलाकारांमध्ये आद्य शर्मा यांचा समावेश आहे.

पंचायत या प्रचंड लोकप्रिय सिरीजचा दुसरा सीझन 20 मे रोजी Amazon Prime Video वर रिलीह होत आहे. फुलेरा नावाच्या गावामध्ये जितेंद्र कुमार पंचायत अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत, तर नीना गुप्ता यांनी गाव प्रमुख आणि रघुवीर यादव मुख्य पतीच्या भूमिकेत आहेत. ही सिरीज जीतूच्या पात्राच्या महत्त्वाकांक्षा, सध्याच्या जबाबदाऱ्या आणि ग्रामीण जीवनातील समस्या विनोदाने हाताळते. या सिरीजची निर्मिती TVF ने केली आहे, ज्याने यापूर्वी हॉस्टेल डेज आणि कोटा फॅक्टरी बनवली आहे.

लिटल इटली आणि ड्राफ्ट डे हे चित्रपट लायन्सगेट प्लेवर स्ट्रीम केले जात आहेत. हेडन क्रिस्टेनसेन लिटल इटलीमध्ये लिओ कॅम्पोची भूमिका करत आहे, तर एम्मा रॉबर्ट्सने निक्की अँजिओलीची भूमिका केली आहे. लिओ आणि निक्कीच्या वडिलांचे जुने वैर आहे जे लिओ आणि निक्कीच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाल्यावर पेटते.


कॉमेडीयन भारती सिंगला शीख समुदायावर विनोद करणे पडले महाग, गुन्हा होणार दाखल