Video: ‘बॉबी देओल मुर्दाबाद’ म्हणत बजरंग दलने ‘आश्रम ३’ वेबसीरिजच्या सेटवर केला हल्ला

We're Looking For Bobby Deol Bajrang Dal Attacks Prakash Jha ashram 3 web series Set
Video: 'बॉबी देओल मुर्दाबाद' म्हणत बजरंग दलने 'आश्रम ३' वेबसीरिजच्या सेटवर केला हल्ला

प्रकाश झा दिग्दर्शित वेबसीरिज ‘आश्रम ३’च्या शूटिंग दरम्यान भोपाळमध्ये रविवारी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यावेळी प्रकाश झा यांच्यासोबत बरजंग दलच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन करून त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. तसेच क्रू मेंबर्सचा पाठलाग करून त्यातील एक जणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली गेली असून लवकरच याप्रकरणी तक्रार दाखल केली जाणार आहे.

बजरंग दलच्या सदस्यांनी सांगितले की, ‘प्रकाश झा दिग्दर्शित बॉबी देओलीची वेबसीरिज ‘आश्रम’मुळे हिंदुत्वाचा अपमान होत आहे. त्यामुळे जोपर्यंत वेबीसीरिजचे नाव बदलले जात नाही, तोपर्यंत ही वेबसीरिज प्रसारित होऊ देणार नाही.’ तसेच बजरंग दलचे एक नेता म्हणाले की, ‘प्रकाश झा यांनी आतापर्यंत याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केली नाही आणि वेबसीरिजचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले आहे.’

रविवारी रात्री भोपाळमध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ‘आश्रम ३’च्या शूटिंग सेटवर जाऊन थेट हल्ला आहे. यावेळी ”प्रकाश झा मुर्दाबाद”, ”बॉबी देओल मुर्दाबाद” आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.

बजरंग दलचे नेता सुशील सुडेले म्हणाले की, ‘त्यांनी ‘आश्रम १’, ‘आश्रम २’ आणि आता ‘आश्रम ३’साठी शूटिंग करत आहेत. प्रकाश झा आश्रममध्ये गुरु महिलांचे शोषण करताना दाखवत आहे. चर्च आणि मदरशांवर अशी वेबसीरिज बनवण्याची हिंमत त्याच्यात आहे का? ते स्वतःला काय समजतात? आम्ही ही वेबसीरिज बनू देणार नाही, असे बजरंग दल आव्हान देते. आता आम्ही फक्त त्यांच्या चेहरा खराब केला आहे. आम्ही बॉबी देओलला शोधत आहोत. त्याने जरा भाऊ सनी देओलकडून काही शिकायला हवे. त्यांनी देशभक्तीवर कसे चित्रपट केलेत.’

दरम्यान याप्रकरणी डीआयजी इरशाद वली यांनी लवकरच कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘ज्या लोकांनी हल्ला आणि तोडफोड केली, त्यांच्याविरोधात आज कारवाई केली जाईल आणि अटक देखील केली जाईल. आतापर्यंत याप्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही आहे. परंतु आम्ही अशा दंगलखोरांवर कारवाई करू. तसेच आश्रम वेबसीरिजच्या क्रू मेंबर्सशी बोलून त्यांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल.’


हेही वाचा – हॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर चुकून गोळीबार, सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू, दिग्दर्शक जखमी