वाचा – चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या महागड्या कपड्यांचे पुढे काय होते?

अनेकदा चित्रपटात जे महागडे कपडे वापरण्यात येतात त्याचे पुढे नेमके काय होते ते जाणून घ्या.

What happens to all the clothes Bollywood actors wear in movies?
चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या महागड्या कपड्यांचे पुढे काय होते

अनेकदा चित्रपटात एखादी भूमिका साकारण्यासाठी नायक – नायिका महागड्या कपड्यांचा वापर करतात. मात्र, हे महागडे कपडे पुढे काय केले जातात? त्या कपड्यांचे काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल ना. दरम्यान, चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या या कपड्यांचे काय होते ते एका फॅशन डिझायरने एका मुलाखतीत सांगितले आहे.

 

स्टायलिस्ट आयशा खन्नाने सांगितले आहे का?

यशराज हे बॉलिवूडमधील सगळ्यात मोठ्या बॅनरपैकी एक बॅनर ओळखले जाते. यशराजची स्टायलिस्ट आयशा खन्नाने मिड डे शी बोलताना याविषयी सांगितले आहे की, अनेकदा चित्रपटात नायक आणि नायिका महागड्या कपड्यांचा वापर करतात. ते कपडे जपून ठेवले जाऊन ते दुसऱ्या चित्रपटाकरता देखील वापरले जातात. अनेकदा हे कपडे वापलेले आहे, असे देखील बोले जाते. तसेच जे जपून ठेवलेले कपडे असतात ते अनेकदा ज्युनिअर आर्टिस्टसाठी वापरले देखील जातात. मात्र, दुसऱ्या चित्रपटासाठी वापरण्याकरता अनेकदा त्यात बदल केले जातात. तर बऱ्याचदा काही कपड हे फॅशन डिझायनर चित्रपटाची आठवण म्हणून देखील ठेवण्यात येतात.

लिलाव देखील केला जातो

अनेकदा चित्रपटात वापरण्या येणाऱ्या कपड्यांचा लिलाव देखील केला जातो आणि त्यातून जे पैसे मिळतात ते एखाद्या समाजसेवी संस्थेला देण्यात येतात. याआधी रोबोट या चित्रपटातील ऐश्वर्या राय आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या कपड्यांचा लिलाव करुन त्यातून आलेले पैसे एका संस्थेला दान करण्यात आले होते. तर बॉम्बे वेलव्हेट, देवदास यांसारख्या चित्रपटात वापरण्यात आलेले कपडे डिझायनरने केवळ या चित्रपटांसाठी कलाकारांना दिले होते आणि पुन्हा ते चित्रिकरणानंतर डिझायनरला देण्यात आले होते.


हेही वाचा – पंकजा मुंडे भाजपमध्येच होत्या, आहेत आणि पुढेही राहणार; पाटील यांची प्रतिक्रिया