घरमनोरंजनIntermittent Fasting : कॉमेडियन भारती सिंहने वेट लॉससाठी केलेलं इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे...

Intermittent Fasting : कॉमेडियन भारती सिंहने वेट लॉससाठी केलेलं इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय ?

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून इंटरमिटेंट फास्टिंग पटकन वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध झाले आहे. हेल्थ एक्सपर्ट्स सुद्धा वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा आधार घेण्याचा सल्ला देतात. भारती सिंह बरोबरच वरूण धवन, आलिया भट्ट, मलाइका अरोरा, सारा अली खान यांसारख्या अनेक कलाकरांनी सुद्धा इंटरमिटेंट फास्टिंग केलेलं आहे.

सुप्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंहने नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला आहे. प्रेग्नेंसीच्या आधी तिने तिचं जवळपास १५ किलो वजन कमी केलं होतं. वजन कमी करण्यासाठी तिने इंटरमिटेंट फास्टिंगचा आधार घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून इंटरमिटेंट फास्टिंग पटकन वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध झाले आहे. हेल्थ एक्सपर्ट्ससुद्धा वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा आधार घेण्याचा सल्ला देतात. भारती सिंह बरोबरच वरूण धवन, आलिया भट्ट, मलायका अरोरा, सारा अली खान यांसारख्या अनेक कलाकरांनीसुद्धा इंटरमिटेंट फास्टिंग केलेलं आहे.

- Advertisement -

परंतु इंटरमिटेंट फास्टिंग हा नक्की काय प्रकार आहे? याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?
पूर्वीच्या काळात मोठमोठी दुकाने, फ्रिज यांसारख्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या, तेव्हा लोक खूप वेळ काहीच खात नसत, त्यामुळे ते फिट राहायचे आणि त्यांचं वजनसुद्धा नियंत्रणात राहायचं. परंतु आताच्या काळातील लोक सतत काहीना काहीतरी खात असतात, अशा खाण्याच्या असंतुलनामुळे लोकांचे वजन वाढत आहे. परंतु इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये कोणत्याही प्रकारची स्ट्रिक्ट डाईट करावी लागत नाही. इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये तुम्ही सगळं खाऊनसुद्धा चांगल्याप्रकारे वजन कमी करू शकता.

- Advertisement -

इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये अनेक जण १६ तासांचा उपवास पकडतात, म्हणजेच जर तुम्ही रात्री ८ वाजता जेवलात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत काहीही खायचं नाही, म्हणजेच तुम्ही १६ तास उपाशी राहाल. या दरम्यान तुम्ही कॅलरीज नसलेले पेय पिऊ शकता. या नंतर दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत तुम्ही हेल्दी पदार्थ खाऊन घ्या.

इंटरमिटेंट फास्टिंगचे फायदे

  • इंटरमिटेंट फास्टिंगचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हेल्थ एक्सपर्टसुद्धा या फास्टिंगचा सल्ला देतात. जर तुम्हाला पण इंटरमिटेंट फास्टिंग करायचे असेल तर तुम्ही त्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
  • इंटरमिटेंट फास्टिंग आपल्या मेटाबॉलिक हेल्थला इम्प्रूव करते, तसेच मेटाबॉलिक हेल्थला बूस्ट करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे वजन पटकन कमी होते.
  • इंटरमिटेंट फास्टिंगमुळे कॅन्सर यांसारख्या आजारांबरोबर लढण्यास मदत होते.
  • इंटरमिटेंट फास्टिंग हृदयाच्या हेल्थ साठी चांगले आहे.
  • इंटरमिटेंट फास्टिंगमुळे मेंदूसाठीसुद्धा उत्तम ठरते.

हेही वाचा :तुमच्या पोटाचा आकार सांगतो आजाराचं रहस्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -