Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन शुभमन गिल-सारामध्ये नेमकं काय चाललंय? 

शुभमन गिल-सारामध्ये नेमकं काय चाललंय? 

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा क्रिकेटर शुभमन गिलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना उधाण आले आहे. युजर्स असेही म्हणत आहेत की, या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. 

अभिनेत्री सारा अली खान हिने अनेकदा तिच्यामध्ये आणि भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू शुभमन गिलमध्ये काहीही नाही, असे सांगितले आहे. परंतु रिपोर्ट्स आणि व्हायरल होणारे फोटोंमधून तरी या दोघांच्यात नक्कीच काहीतरी सुरू असल्याचेच दिसून येत आहे. सारा आणि शुभमन गिल यांच्या लिंकअपच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. आता सारा आणि शुभमन गिलचा एक फोटो समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामुळे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे त्यांच्या चाहत्यांकडून बोलले जात आहे.

एका युजरने सारा आणि शुभमनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सारा क्रिकेटर शुभमन गिलसोबत गप्पा मारताना आणि आनंदात वेळ घालवताना दिसत आहे. हे चित्र जयपूर विमानतळाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सारा अली खान आणि शुभमन गिल या दोघांनीही या अफेअरच्या बातम्यांवर आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र या चित्रामुळे त्यांच्या अफेअरला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. पण हा फोटो आत्ताचा आहे की जुना हे कळू शकलेले नाही.

- Advertisement -

सारा आणि शुभमन दोघेही त्यांच्या नात्याबद्दल काहीही बोलताना दिसून येत नाहीयेत. पण त्यांच्या नेहमीच एकत्र दिसण्याने त्या दोघांमध्ये नक्कीच काही तरी सुरु असल्याचे त्यांच्या चाहत्यांकडून वारंवार बोलले जात आहे. सारा आणि शुभमन एकदा हॉटेलमध्ये जेवणासाठी भेटले होते, तेव्हापासून या दोघांच्या नात्यांच्या चर्चेला उधाण आले आहे.

‘आमची वहिनी कशी असावी, सारा वहिनीसारखी असावी’

- Advertisement -

सारा आणि शुबमन गिल यांच्यात काहीतरी सुरू आहे, याबाबत विराट कोहलीच्या एका व्हिडिओमधून प्रकर्षाने जाणवून आले. हा व्हिडिओ एका सामन्यादरम्यानचा आहे, ज्यामध्ये स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले आहे. विराट कोहली समोर मैदानात आहे. अचानक प्रेक्षकांमधून शुभमन गिल आणि सारा अली खान यांच्या नावाच्या घोषणा ऐकू येतात. याचवेळी आमची वहिनी कशी असावी, सारा वहिनीसारखी असावी.’ असे ऐकू येत आहे. विराट कोहलीने ही घोषणा ऐकताच त्याने प्रेक्षकांना जोरात बोलण्याचे संकेत दिले. विराट कोहलीचा हा व्हिडिओ अजूनही चर्चेत आहे.

हेही वाचा – ‘या’ कलाकाराने सोडला ‘द कपिल शर्मा शो’

साराला डेट करण्याच्या बातमीवर शुभमनची प्रतिक्रिया

दुसरीकडे, पंजाबी चॅट शो ‘दिल दियां गल्लन’मध्ये जेव्हा अभिनेत्री सोनम बाजवाने शुभमन गिलला साराला डेट करण्याच्या बातम्यांबद्दल विचारले, तेव्हा त्याने सांगितले की कदाचित मी तिला डेट करत आहे. जेव्हा सोनम म्हणाली की साराचे संपूर्ण सत्य सांगा, तेव्हा शुभमन चुटकीसरशी म्हणाला की, ‘सारा दा सारा सच बोल दिया’ म्हणजेच मी सगळं काही खरे बोललो आहे, असे म्हणत आहे.

- Advertisment -