Manike Mage hithe: ‘मनिके मागे हिते’ या गाण्याचा अर्थ काय रे भाऊ?

श्रीलंकन गायिका योहानी हिच्या आवाजातल्या गाण्याने इंन्स्टाग्राम रिल्स सारख्या माध्यमांवर धुमाकूळ घातला

what is the meaning of Manike Mage hithe?
Manike Mage hithe: 'मनिके मागे हिते' या गाण्याचा अर्थ काय रे भाऊ?

सोशल मीडियावर फार कमी वेळेत प्रचंड लोकप्रिय झालेले गाणे म्हणजे मणिके मागे हिते. श्रीलंकन भाषेत असलेले हे गाणे केवळ श्रीलंकेतच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले. आजही हे गाणे ट्रेडिंग गाण्याच्या लिस्टमध्ये आहे. श्रीलंकन गायिका योहानी हिच्या आवाजातल्या गाण्याने इंन्स्टाग्राम रिल्स सारख्या माध्यमांवर धुमाकूळ घातला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या गाण्याने थिरकायला भाग पाडले. चार महिन्यात या गाण्याला १२७,६७९,८९८ हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींपासून सर्वसमान्यांपर्यंत सर्वांनी या गाण्यावर नाच केला असेल किंवा आपल्या आवाजात हे गाणे डब देखील केले असेल मात्र या गाण्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? जाणून मनिके मागे हिते या गाण्याचा नेमका अर्थ काय आहे.

मणिके मागे हिते या गाण्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही माझ्या ह्रदयात आहात, ह्रदयातला प्रत्येक क्षण तुमचा विचार करतो. जळणाऱ्या आगीप्रमाणे तुमच्या शरीराचा आकार मला माझे डोळे बंद करू देत नाही. तुम्ही माझ्या ह्रदयाजवळ आहात. तुम्ही एका देवाप्रमाणे दिसता ज्याने माझे मन प्रफ्फुलित होते. तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे आहात म्हणून तुम्ही माझ्या ह्रदयाजवळ आहात.

मनिके मागे हिते या गाण्याची गायिका योहानी हिने २०१६मध्ये तिच्या युट्यूब करिअरला सुरुवात केली. योहानीला रॅप साँग गायला प्रचंड आवडतात. रॅप प्रिसेंसचा किताब देखील योहानीला मिळाला आहे. त्याचप्रमाणे योहानीने एक बॉलिवूड सिनेमा देखील साईन केला आहे.

योहिनीच्या या श्रीलंकीयन गाण्याचे इतर भाषेतील व्हर्जन आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र योहानीच्या आवाजातल्या गाण्याला कुठेच तोड नाही. नुकताच अमृता फडणवीस यांनी देखील योहानीच्या गाण्यावरुन इंन्स्पायर होऊन मनिके मागे हिते गाण्याचे हिंदी वर्जन लाँच केले. त्यांचे हे गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.


हेही वाचा – kamal haasan Covid Positive: कमल हासन यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती