घर मनोरंजन तुझा परफ्यूम कुठला...? चाहत्याच्या प्रश्नावर प्रियंकाने दिलं हटके उत्तर

तुझा परफ्यूम कुठला…? चाहत्याच्या प्रश्नावर प्रियंकाने दिलं हटके उत्तर

Subscribe

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या हॉलिवूड वेब सीरिज आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त प्रियंका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा प्रियंकाचे तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच, आता प्रियंकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रियंका पती निक जोनसच्या लॉस एंजेलिसमधील कॉन्सर्टमध्ये दिसली होती. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियंकाने चाहत्याला दिलं मजेशीर उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

प्रियंका सध्या जोनास ब्रदर्सच्या या कॉन्सर्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. या कॉन्सर्टमधून प्रियंकाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. याच कॉन्सर्टमध्ये प्रियंकासोबत प्रीती झिंटा देखील दिसली होती. नुकताच एक व्हिडीओ सध्या जास्त व्हायरल होत आहे ज्यात एक चाहता प्रियंकाला तुम्ही कॉन्सर्ट दरम्यान कोणते परफ्यूम लावले आहे असा प्रश्न विचारताना दिसत आहे. यावर प्रियंका म्हणाली की, ‘त्याला असा वास येतो’ प्रियंकाचं हे मजेशीर उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या चित्रपटात दिसणार प्रियंका चोप्रा

- Advertisement -

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा मागील काही महिन्यांपूर्वी तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत होती. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.

 


हेही वाचा : अयान मुखर्जीने केला ‘ब्रह्मास्त्र 2’चा प्रोमो

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -