घरमनोरंजन'व्हॉट विल पीपल से' चित्रपटाची ऑस्कर २०१९ मध्ये एंट्री

‘व्हॉट विल पीपल से’ चित्रपटाची ऑस्कर २०१९ मध्ये एंट्री

Subscribe

अभिनेता आदिल हुसेन यांचा 'व्हॉट विल पीपल से' या चित्रपटाला ऑस्कर २०१९ साठी अधिकृत एंट्री मिळाली आहे.

सिनेसृष्टीतील कसदार अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिल हुसेन यांच्या चित्रपटांने आंतरराष्ट्रीय पातळीवरही समीक्षकांनी वाहवाही मिळवली आहे. अभिनेता आदिल यांच्या ‘व्हॉट विल पीपल से’ या चित्रपटाला ऑस्कर २०१९ मध्ये अधिकृत एंट्री मिळाली आहे. याबाबत स्वतः आदिल हुसेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली असून सर्व कलाकार आणि क्रू मेंमर्सचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

२०१७ साली टोरंटोमधील महोत्सवात प्रदर्शीत

लेखक-दिग्दर्शक इराम हक् यांच्या या चित्रपटात आदिल हुसेनसह मारिया मोझबा प्रमुख भूमिकेत असून यामध्ये एकवली खन्ना, रोहीत सराफ, अली अर्फान, शिबा चढ्ढा, जन्नत झुबेन रेहमानी आणि ललील परीमो आदी कलाकार आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट ‘४२ व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हम’ध्ये प्रदर्शीत करण्यात आला होता. पाकिस्तानी कथानकावर बेतलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील राजस्थान शहरात करण्यात आले आहे.

अभिनेता आदिल हुसेनची फिल्मोग्राफी 

भारतातील आसाम भागातू आलेल्या या कलाकाराने नाटक, छोटा पडदा आणि चित्रपट या तिनही माध्यमातून आपल्या कसदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. २०१२ साली दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या इंग्लिश विंग्लिश या चित्रपटानंतर त्यांना बॉलीवूडमध्ये विशेष ओळख मिळाली. त्यांच्या लाईफ ऑफ पाय, लुटेरा, फोर्स २, एजंट विनोद, अॅंग्री इंडियन गॉडेस सारखे असंख्य चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले आहेत. त्यातील त्यांच्या भूमिकाही पसंत केल्या आहेत. विविध भाषांमध्ये आदिल यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -