हनीमून अर्धवट सोडत Ajay Devgan ने केला होता घरी जाण्याचा हट्ट, म्हणाला…

काजोलने अजय सोबत लग्न करण्यासाठी काही अटी शर्ती ठेवल्या होत्या. लग्नानंतर हनीमूनला दोन महिन्यांसाठी वर्ल्ड टूर जायचे असा काजोलचा हट्ट होता. मात्र हनीमूनला जाताच अजयने मात्र हनीमूनसोडून घरी जाण्याचाच हट्ट धरला होता.

... तर अजय देवगण झाला असता कपूर कुटुंबाचा जावई
... तर अजय देवगण झाला असता कपूर कुटुंबाचा जावई

बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल अजय देवगण (Ajay Devgan ) आणि काजोल (Kajol )  यांच्या संसाराला 23 वर्ष झाली आहेत. त्यांच्यातील बॉडिंग आजही तितकच भारी आहे. अजय देवगण आणि काजोल यांच्या हनीमूनचा किस्सा आजही प्रसिद्ध आहे. दोघेही लग्नानंतर हनीमूनसाठी वर्ल्ड टूरवर गेले होते. मात्र हनीमूनला जाताच अजय देवगणने काजोलकडे घरी परत जाण्याचा हट्ट केला होता. काय आहे हा किस्सा जाणून घ्या.

इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, काजोलने अजय सोबत लग्न करण्यासाठी काही अटी शर्ती ठेवल्या होत्या. लग्नानंतर हनीमूनला दोन महिन्यांसाठी वर्ल्ड टूर जायचे असा काजोलचा हट्ट होता. मात्र हनीमूनला जाताच अजयने मात्र हनीमूनसोडून घरी जाण्याचाच हट्ट धरला होता. एका मुलाखतीत काजोलने सांगितले होते, लग्नानंतर आम्ही हनीमूनसाठी निघालो. आम्ही ऑस्ट्रेलियावरुन लॉस एंजेलिस आणि नंतर वेगासला पोहोचलो. यात जवळपास 1 महिना गेला.

काजोल पुढे म्हणाली, आम्ही जेव्हा ग्रीसला पोहोचलो तेव्हा टूर करुन फार थकलो होतो. अजयने त्यावेळीस घरी जाण्याचा हट्ट धरला होता. आम्ही ग्रीसमध्ये होतो आणि टूरला जवळपास 40 दिवस झाले होते. एका सकाळी अजय झोपेतून उठला आणि मला म्हणाला, ‘मला ताप आलाय आणि डोके देखील दुखत आहे’. मी त्याला म्हणाले, ‘मी औषधे घेऊन येते’. मात्र तो म्हणाला, ‘नाही मी ठिक आहे’. तेव्हा मी त्याला विचारले, ‘आता आपण काय करायचे’ तेव्हा तो म्हणाला, ‘आता बस्स झाला. आता घरी जाऊया’. मी म्हणाले, ‘डोके दुखतय म्हणून घरी जायचे’ तो म्हणाला, ‘नाही बस्स झालं मी आता थकलोय घरी जाऊया’. अशाप्रकारे हनीमून अर्धवट टाकून काजोल आणि अजय मुंबईला परत आले होते.


अजय देवगण आणि काजोल 1994 पासून एकमेकांना डेट करत होते. जवळपास 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी 1999 मध्ये लग्न केले. काही जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थित दोघांनी लग्न केले होते. अजय देवगण आणि काजोल 2020मध्ये आलेल्या ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर्स’ या सिनेमात अजय आणि काजोलची जोडी अनेक वर्षांनी पहायाला मिळाली.


हेही वाचा – ‘सरोगसी पॅरेंट्स म्हणजे रेडिमेड मुलं’, सरोगसीद्वारे पालक बनणाऱ्या सेलिब्रिटींवर लेखिकेचा निशाणा?