बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमी चर्चेत असतात. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. वयाच्या 81 व्या वर्षातही ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र, एक काळ असा होता की अमिताभ बच्चन यांचे 9 चित्रपट फ्लॉप झाले होते.
अमिताभ बच्चन यांचे ‘सिलसिला’मधलं ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे आयकॉनिक गाणे रिलीज होऊन 43 वर्षे झाली, पण आजही लोक या गाण्यावर नाचतात. तर आज तुम्हाला या गाण्याशी संबंधित एक घटना सांगणार आहोत, ज्याबद्दल बिग बींच्या चाहत्यांना कदाचितच माहिती असेल.
एकेकाळी सलग 9 चित्रपट फ्लॉप झाले होते
अमिताभ बच्चन यांचे सलग 9 चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक फ्लॉप झाले. अशा परिस्थितीत बिग बी खूप नाराज झाले होते. त्यांची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर होती. मग होळी आली आणि अभिनेत्याला आरके स्टुडिओच्या होळी पार्टीचे आमंत्रण मिळाले. राज कपूर यांची होळी पार्टी इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध होती. या पार्टीसाठी निवडक कलाकारांनाच आमंत्रण मिळायचे. हे आमंत्रण मिळालेल्या कोणत्याही स्टारसाठी ही अभिमानाची गोष्ट होती.
राज कपूर यांनी खास सल्ला दिला
अशा परिस्थितीत अमिताभ बच्चनही या पार्टीत सहभागी होण्यासाठी आरके स्टुडिओत पोहोचले. बिग पार्टीत एका कोपऱ्यात शांतपणे उभा होते. अभिनेत्याला एकटे पाहून राज कपूर त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की आज होळीच्या दिवशी थोडी मजा करूया, बघा किती मोठी लोक पार्टीला आली आहेत, कुणास ठाऊक इथे काहीतरी घडेल. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनीही ही संधी सोडली नाही.
अमिताभ बच्चन यांच्या एका गाण्याने त्यांची कारकीर्द घडवली
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वडिलांनी लिहिलेले ‘रंग बरसे’ हे गाणे त्यांच्या आवाजात पार्टीत गायले आणि ते प्रसिद्ध झाले. आरके स्टुडिओमध्ये उपस्थित असलेले सर्वजण हे गाणे ऐकून खूप प्रभावित झाले. त्यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा देखील तिथे उपस्थित होते. यश चोप्रांनी लगेचच अमिताभ बच्चन यांना ‘सिलसिला’ चित्रपटासाठी कास्ट केले.
यश चोप्रांनी ऑफर दिली होती
चोप्रांना अमिताभ यांची स्टाईल आणि त्यांचे गाणे इतके आवडले की त्यांनी बिग बींना त्यांचा ‘सिलसिला’ चित्रपट ऑफर केला. चित्रपटातही हे गाणे अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. 1981 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट काही फारसा गाजला नाही पण या चित्रपटातील ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे होळीचे गाणे सुपरहिट ठरले.