घरमनोरंजनआनंद-सोनमचा 'तो' क्यूट फोटो व्हायरल

आनंद-सोनमचा ‘तो’ क्यूट फोटो व्हायरल

Subscribe

सोनम व आनंदचा एक फोटो सध्या वेगाने व्हायरल होतोय. दिल्लीच्या एका शू स्टोरच्या लॉन्चिंगदरम्यानचा हा फोटो आहे.

सोनम कपूर, आनंद अहुजा हे कपल बॉलिवूडमध्ये सगळ्यांच आवडतं आहे. लग्ना आधीपासूनच या दोघांमधील क्यूट बॉण्डींग नेहमीच सगळ्यांना दिसलं. त्या दोघांचे व्हीडीओ, फोटो कायम व्हायरल होत असतात. आनंद सोनमची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेलं नाही. त्यांच्या प्रत्येक व्हायरल होणाऱ्या फोटोत आनंद तीची किती काळजी घेतो हे आपण बघितलं आहे. सध्या या दोघांचा एक फोटो सोशलमिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सोनम व आनंदचा एक फोटो सध्या वेगाने व्हायरल होतोय. दिल्लीच्या एका शू स्टोरच्या लॉन्चिंगदरम्यानचा हा फोटो आहे. यादरम्यान सोनमने एक शू पेयर ट्राय केली. सोनमन बुट पायात टाकले आणि पुढच्याच क्षणाला आनंदने गुडघ्यावर बसत तिचे शू लेस बांधलेत. आनंद सोनमच्या बुटांची लेस बांधत होता यावेळी सोनम मनातल्या मनात चक्क लाजत होती.

- Advertisement -

 चाहते झाले खूष

या दोघांचा हा फोटो सोशलमिडीयावर व्हायरल होतोय. हा फोटो बघून चाहते खूप खूष झाले आहेत. सोनम आणि आनंदची जोडी नंबर वन आहे. तर सोनमने अगदी योग्य जोडीदार निवडला अशी प्रतिक्रीया ही दिली.

- Advertisement -

2018 मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकलेत. आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे. आनंदचे वषाकार्ठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. आनंदला फिरण्याशिवाय शूज आणि कारची आवड आहे. आनंद प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -