घरमनोरंजनजेव्हा दिलीप कुमार यांनी ७ ऑस्कर अवाॅर्ड जिंकणारे हॉलीवूड चित्रपट नाकारले....

जेव्हा दिलीप कुमार यांनी ७ ऑस्कर अवाॅर्ड जिंकणारे हॉलीवूड चित्रपट नाकारले….

Subscribe

हॉलिवूडमधील अनेक सिनेमाच्या ऑफर आल्या होत्या. पण दिलीप कुमार यांनी त्या धुडकावून लावल्या त्यांना हॉलिवूडमध्ये काम करण्यात काही रस नव्हता.

हिंदी सिनेसृष्टीतील एक अजरामर तारा आज निखळला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये आज सकाळी ७.३० वाजता दिपील कुमार यांचे निधन झाले. बॉलिवूड विश्वात 50 च्या दशकात आपली कारकिर्द घडवणारा रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दिग्गज अभिनेता हरपल्याने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडचा ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे मेगास्टार अभिनेते दिलीप कुमार यांनी तब्बल पाच दशके रुपेरी पडद्यावर अनेक हिट सिनेमा दिले होते. त्यांच्या अभिनयाने प्रत्येक व्यक्ती प्रभावीत होत असे. शाहरुख खान सारखा अभिनेता त्यांच्या अभिनयाने प्रभावीत होऊन त्यांना फॉलो करत असे.

बॉलिवूड सोबतच दिलीप कुमार यांच्या अभिनयाची भूरळ हॉलिवूडमध्ये देखील चर्चेत होती. त्यांना हॉलिवूडमधील अनेक सिनेमाच्या ऑफर आल्या होत्या. पण दिलीप कुमार यांनी त्या धुडकावून लावल्या त्यांना हॉलिवूडमध्ये काम करण्यात काही रस नव्हता. दिलीप कुमार यांना हॉलिवूड मधील ‘लॉरेंस ऑफ अरेबिया’ हा प्रसिद्ध सिनेमाची ऑफर मिळाली होती. हा सिनेमा दिग्दर्शक डेविड यांनी केला होता. डेविड या सिनेमात प्रिंस शेरीफ अलीच्या भूमिकेसाठी कोणत्याही यूरोपियन ॲक्टरची निवड न करता डेविडने ही भूमिका दिलीप कुमार यांना ऑफर केली. पण दिलीप कुमार यांनी प्रिंस अलीची भूमिका साकारण्यास नकार दिला. दिलीप कुमार यांना हॉलिवूडमध्ये काम करण्यात काहीही रस नव्हता.
दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मकथेत याबाबत संपुर्ण माहिती लिहली आहे. त्यांच्या मते त्यांनी प्रिंस अलीचा रोल केला असता तर तो फार वरकर्णी तसेच खोटा वाटला असात. यामुळे त्यांनी हॉलिवूड सिनेमात काम करण्यास नकार दिला. दिलीप कुमार नंतर हा रोल ओमार शरीफ या अभिनेत्याने निभावला. तसेच या सिनेमाला 1962 साली 10 ऑस्कर अवॉर्ड साठी नॉमिनेट करण्यात आले होते. त्यापैकी ‘लॉरेन्स ऑफ अरेबियाने’ 7 अवॉर्ड जिंकले होते.

- Advertisement -


हे हि वाचा – Dilip Kumar Death: कारगिल युद्धाच्या वेळी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फटकारले होते,म्हणाले…



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -