घरमनोरंजन...जेव्हा अमिताभ बच्चन यांनाच सल्लूभाई समजले फॅन्स

…जेव्हा अमिताभ बच्चन यांनाच सल्लूभाई समजले फॅन्स

Subscribe

अमिताभला चक्क सलमान समजून हाक मारण्यात आली.

भारतीय चित्रपट सृष्टीतील महानायक हे फक्त बॉलिवूडचे ‘बिग बी’ च नाही तर, संपूर्ण जगात त्यांचा जबरदस्त असा चाहता वर्ग आहे. यामध्ये कोणी फिल्मी चाहता त्यांना ओळखू शकणार नाही अशी कोणी कल्पनाही करु शकत नाही..अशी एक घटना स्कॉटलैंड येथे घडली होती. अभिताभ एका चित्रपटाचे चित्रिकरण करत असताना एका चाहत्याने त्यांना सलमान खान असे समजले होते. बिग बींनी स्वत: याबद्दल सांगितले होते.

अमिताभ याबाबत सांगताना म्हणाले, ग्लासगो येथे शूटींग साठी गेले होते, दरम्यान ते ग्लोसगोच्या रस्त्यावर चालत असताना त्यांच्या मागून आलेली एक गाडी येवून थांबली आणि त्यातून हे सलमान, कसा आहेस? असे म्हणाले याबद्दल चा खुलासा अमिताभने ट्विटरवर केला होता यावर प्रतिक्रिया करताना अभिषेक हसत म्हणाले की, हा हा हा, असे नाही होवू शकत.. यूजर्सनी ही यावर प्रतिक्रिया करताना अमिताभला ‘ही मस्करी तर नाहीना’ असे बोलत होते. यावर अमिताभने हो असं खरचं झाले आहे असे सांगितले होते. अशा अनेक गमतीशीर प्रतिक्रिया अमिताभ यांना आल्या होत्या. तसं पाहायला गेलं तर अमिताभ आणि सलमान उंचीपासून चालण्याबोलण्यातही खूप फरक आहे. अमिताभ आणि सलमान ‘गॉड तुस्सी ग्रेड हो’, बागबान,बाबुल या चित्रपटात एकत्र दिसले होते.

- Advertisement -

हे वाचा-‘पोरगं मजेतय’ लवकरच चित्रपटगृहात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -