घरमनोरंजनभारतातील मुलींना आळशी म्हणताच... सोनाली कुलकर्णी होतोय ट्रोल

भारतातील मुलींना आळशी म्हणताच… सोनाली कुलकर्णी होतोय ट्रोल

Subscribe

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठल्यातरी कार्यक्रमादरम्यानचा असून सोनाली या समोर बसलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहे. या व्हिडीओत सोनालीने भारतातील मुली आळशी असल्याचं म्हटलं शिवाय मुलींना चांगले पैसे कमावणारा नवरा किंवा बॉयफ्रेंड हवा असतो. मात्र, त्या स्वतः काहीच करत नाहीत, असं ती म्हणाली. दरम्यान, आता सोनालीच्या या व्यक्तव्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलं परंतु आता दुसरीकडे अनेकजण सोनालीवर टीका करत आहेत.

सध्या सोनालीच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “भारतातील स्त्रिया आळशी आहेत, असं एक उच्चवर्णीय महिलाच म्हणू शकते. या देशातील महिलांकडे पहा. कामाचा योग्य मोबदला न मिळणाऱ्या महिलांना त्या गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. या देशात महिला कोणत्या परिस्थितीतून जातात याचा सरकारी डेटा वाचायला हवा. मिस कुलकर्णी”.

- Advertisement -

तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “यांच्या मते, गृहिणी आळशी असतात, पण नोकरी करणाऱ्या स्त्रिया ज्या आपल्या पती आणि कुटुंबासाठी कोणतीही जबाबदारी पार पाडत नाहीत त्या आळशी नसतात. पगारी सुट्ट्या नसतानाही जबाबदाऱ्या पार पाडणे हे गृहिणींचे सर्वात कठीण काम आहे”.

तर तिसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “मला वाटते की मुलींनी नुकतेच वर बघायला सुरुवात केली आहे आणि तिच्यासारख्या स्त्रिया आधीच मुलांची बाजू घेऊन त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मला खात्री आहे की, तिलाही मुलगे आहेत. महिलांनी फ्रीज खरेदीसाठी 50% द्यावे असे वाटत असेल तर मुलांनी 50% गृहपाठ करावा असे तिने म्हटले तर मी त्याचे कौतुक करू शकतो.”

- Advertisement -

 


हेही वाचा :

जपानमध्येही ‘RRR’ची जादू; लवकरच करणार 100 कोटींचा टप्पा पार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -