घरमनोरंजनजेव्हा जग्गू दादा बनतो ट्रॅफीक हवालदार

जेव्हा जग्गू दादा बनतो ट्रॅफीक हवालदार

Subscribe

जॅकीनं स्वतः गाडीबाहेर येऊन ते ट्रॅफीक क्लिअर केलं आणि त्यानंतर गाडीत बसून निघून गेला. गाडीच्या आत असणाऱ्या माणसानं व्हिडिओ शूट केला आहे.

जॅकी श्रॉफ ऊर्फ जग्गू दादा हा बॉलीवूडमधील एक बिनधास्त कलाकार. त्याचे चाहतेही अनेक आहेत. स्टार असूनही कधीही स्टारचे नखरे न दाखवणारा असा हा जग्गू दादा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते एका व्हिडिओमुळं. जॅकी श्रॉफनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. आपल्या कारच्या पुढे जमा झालेलं ट्रॅफीक जग्गू दादानं आपल्या कारमधून उतरून क्लिअर केलं आणि पुन्हा कारमधून बसून निघून गेला.

- Advertisement -

काय आहे का मजेशीर व्हिडिओ

अभिनेता जॅकी श्रॉफ सध्या लखनऊमध्ये आपल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला आहे. नवाबांच्या शहर लखनऊमध्ये चित्रीकरणासाठी एका रस्त्यावरून जात असताना जॅकी श्रॉफची गाडी ट्रॅफीकमध्ये फसली. त्यानंतर जॅकीनं स्वतः गाडीबाहेर येऊन ते ट्रॅफीक क्लिअर केलं आणि त्यानंतर गाडीत बसून निघून गेला. गाडीच्या आत असणाऱ्या माणसानं हा व्हिडिओ शूट केला आहे. त्या माणसाचा आवाजही या व्हिडिओमध्ये ऐकू येत असून नक्की हा माणूस कोण होता हे मात्र कळू शकलेलं नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जॅकीच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स द्यायला सुरुवात तर केलीच, शिवाय जॅकीची स्तुतीदेखील केली आहे. सध्या जॅकी श्रॉफ आपल्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये लखनऊमध्ये व्यस्त असल्याची माहिती आहे. जॅकी श्रॉफचा सध्या कोणताही नवा चित्रपट आलेला नाही. मात्र काही चित्रपटांमध्ये त्यानं पाहुण्या कलाकाराच्या भूमिका सध्या साकारल्या आहेत. दरम्यान जॅकीचा मुलगा टायगर श्रॉफ सध्या बॉलीवूडमध्ये आपला जम बसवत असून त्याचे दोन्ही चित्रपट हिट ठरले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -