Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन हॉरर अवतार पाहून दचकली क्रू टीम, कृति सेननने शेअर केला राब्ताच्या सेटचा...

हॉरर अवतार पाहून दचकली क्रू टीम, कृति सेननने शेअर केला राब्ताच्या सेटचा अनुभव

Subscribe

बॉलीवुड अभिनेत्री कृति सेननने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. यामधला एक चित्रपट ‘राब्ता’ जो २०१७ मध्ये प्रर्दशित झाला होता. कृति सेनन,सुशांत सिंह राजपूत लीड रोल मध्ये होते. कृतिने डबल रोल प्ले केला होता. परंतु बॉक्स ऑफिस वर या चित्रटाने फारशी कमाल दाखवली नाही. पण या चित्रपट दरम्यान अनेक किस्से चर्चेत राहिले. शूटिंगच्या सेट वर झालेल्या गंमतीशीर गोष्टी अभिनेत्यांनी शेअर केल्या.

कृति सेननने 2017 मध्ये एका मुलाखती मध्ये सांगितले होते, कि राब्ता चित्रपटाची शूटिंग एका हवेली मध्ये करण्यात आली होती. माझ्यात आणि जिम मध्ये इंटेस सीन शूट केला जात होता. टेकच्या एक मिनिटा पूर्वी मी मोठ्याने किंचाळत होती. काही अशा पध्दतीत की माझ फुफ्फुसच बाहेर येईल. हे करण्यासाठी खूप ताकत लागत होती. आणि यामुळे मला मानसिक व शारिरिक त्रास झाला होता. हे खूप मजेशीर वाटत होत, कारण डिनू ( दिनेश विजान ) ने नंतर मला सांगितले कि क्रू मेंबरला वाटत होत, कृति मध्ये कोणते भुत शिरले. कृति सेनन आणि सुशांत सिंह राजपूत ने उत्तम दर्जा काम करून सीन्स चित्रित केला होता.

- Advertisement -

‘राब्ता’ ही दोन प्रियकरांची कथा आहे. जुन्या काळापासुन आताच्या काळापर्यंतचा त्याच्यांतल्या प्रेमाचा प्रवास दाखवला आहे. दिनेश विजान निर्मित या चित्रपटामध्ये कृति आणि सुशांत आहेतच. पण दीपिका पादुकोण,जिम सरभ यांनी देखील आपली उत्तम कामगिरी दाखवली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -