घरताज्या घडामोडीICUमध्ये असलेल्या बिग बींसाठी शॅम्पेन घेऊन गेले होते राज कपूर, वाचा धमाल...

ICUमध्ये असलेल्या बिग बींसाठी शॅम्पेन घेऊन गेले होते राज कपूर, वाचा धमाल किस्सा

Subscribe

राज कपूर यांच्या प्रेमाचे, त्यांच्या आयुष्य जगण्याच्या विशिष्ट शैलीचे अनुकरण कोणीही करू शकत नाही.

बॉलिवूड सिनेमाचे एकेकाळचे स्टार असलेले दोन दिग्गज कलाकार म्हणजे राज कपूर आणि अमिताभ बच्चन. बिग बी बॉलिवूडचे महानायक होते तर राज कपूर बॉलिवूड सिनेमाचे शोमॅन. दोन्ही अभिनेत्यांनी बॉलिवूडला चार चाँद लावले. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. दोघांच्या मैत्रीचा एक किस्सा जो आजवर अनेकांना माहिती नसेल तो म्हणजे अमिताभ बच्चन जेव्हा आयसीयूमध्ये होते तेव्हा राज कपूर चक्क शॅम्पेनची बाटली घेऊन रुग्णालयात त्यांना पहायला गेले होते. कुली सिनेमाच्या शुटींगदरम्यान बिग बींना दुखापत झाली होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होत तेव्हाचा हा किस्सा आहे. तेव्हा राज कपूर चेहऱ्यावर मोठ हास्य आणि हातात शॅम्पेनची बॉटल घेऊन गेले होते. हा किस्सा स्वत: बिग बींनी त्यांच्या ऑटोबायोग्राफी लाँचवेळी सांगितला होता.

 

- Advertisement -

बिग बी म्हणाले होते की, राज कपूर यांच्या प्रेमाचे, त्यांच्या आयुष्य जगण्याच्या विशिष्ट शैलीचे अनुकरण कोणीही करू शकत नाही. त्यांचे कामही तसेच होते त्यांच्यासारखे काम आजवर कोणीही केले नाही. मी जेव्हा ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये होतो तेव्हा ते चेहऱ्यावर इतक सुंदर हास्य घेऊन मला भेटायला आले होते त्यांच्या हातात शॅम्पेनची बॉटलही होती ती पाहून मी देखील शॉक होतो असे बिग बी म्हणाले होते.

- Advertisement -

अमिताभ यांची प्रकृती पाहून राज कपूर शॅम्पेनची बाटली दाखवत म्हणाले होते, ‘या बाटलीसोबत आपल्याला प्रेमाचे जहाज देखील पुन्हा एकदा लाँच करायचे आहे’, बिग बी हा किस्सा सांगताना फार भावूक झाले होते.

यावेळी बिग बींनी राज कपूर यांच्यासोबतचा आणखी एक किस्सा देखील सांगितला होता. बिग बी आणि राज कपूर एका कार्यक्रमाला एकत्र गेले होते त्यावेळी आयोजकांनी राज कपूर यांना गाण गायला सांगितलं त्यावर राज कपूर यांनी सारे जहाँ से अच्छा हिंदोस्त हमारा हे गाणं गायलं होतं. बिग बी पुढे म्हणाले होते की, राज कपूर एका शब्दाचे प्रतिक होते ते म्हणजे भारत. जगात कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलात तर आपली भारतीय म्हणून ओळख ही त्यांच्या नावाने ओळखली जाते. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या घटनानंचे वर्णन करणे कठीण आहे.

राज कपूर हे एक उत्तम अभिनेतेच नाही तर उत्तर निर्माता दिग्दर्शकही होते. १९८८मध्ये वयाच्या ६५व्या वर्षी राज कपूर यांचे दिल्लीत निधन झाले. आजही प्रेक्षकांच्या मनावर राज कपूरची यांची छाप कायम आहे.


हेही वाचा – निर्माता समीर विद्वांसने कलाकारांच्या वतीने जोडले प्रेक्षकांसमोर हात, म्हणाला…

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -