जेव्हा शूटिंग दरम्यान सलमान आणि शाहरूखची अचानक भेट होते; जुना व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये सलमान खान गाण्याचे शूटिंग करत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरूख खान आणि सलमान खान यांची मैत्री आणि नातं नेहमीच चर्चेत असतात. या दोघांचेही करोडो चाहते आहेत. त्यामुळे सलमान आणि शाहरूख जेव्हापण एकमेकांना भेटतात, तेव्हा त्या दोघांचे चाहते खूप खूश असतात. अशातच त्यांच्या चाहत्यांसाठी सलमान आणि शाहरूखचा एक व्हिडीओ समोर आला आहे. खरंतर हा एक खूप जुना व्हिडीओ आहे, जो सुलतान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता.

शाहरूख खान आणि सलमान खान न पाहिलेला व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये शाहरूख खान आणि सलमान खान चित्रपटाच्या सेट वर दिसत आहेत. या दरम्यान सलमान खान शूटिंगमध्ये व्यस्त दिसत आहे. तेवढ्यात सेट वर शाहरूख खानची एन्ट्री होते, शाहरूखला पाहून सगळे जण आश्चर्यचकित होतात. त्यावेळी शाहरूख खान आणि सलमान खान एकमेकांना मिठी मारतात. त्यावेळी सेटवरील संपूर्ण टीम अजूनच आश्चर्यचकित होते. या व्हिडीओमध्ये सलमान खान गाण्याचे शूटिंग करत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दोघांचे चाहते हा व्हिडीओ पाहून अनेक कमेंट देखील करत आहेत.

शाहरूख आणि सलमानचा आगामी चित्रपट
सध्या शाहरूख खान त्याच्या ‘पठाण’, ‘जवान’ या चित्रपटांमध्ये दिसणार असून सलमान खान ‘टायगर 3’, ‘गॉडफादर’, ‘किक 2’, ‘बजरंगी भाईजान 2’ या चित्रपटात दिसणार आहे.

 


हेही वाचा :मुंबईच्या रस्त्यांपेक्षा दिल्ली आणि मथुरेचे रस्ते बरे! हेमा मालिनींचा संताप