घरमनोरंजनगर्लफ्रेंडच्या वडिलांनी जेव्हा सलमानला रंगेहात पकडलं

गर्लफ्रेंडच्या वडिलांनी जेव्हा सलमानला रंगेहात पकडलं

Subscribe

सध्या सलमान 'दस का दम' या शो मध्ये सलमान आलेल्या सेलिब्रिटींबरोबर मजा करताना दिसत आहे. यावेळी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सलमाननं शेअर केल्या.

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेमध्ये असतो. सध्या त्याच्या ‘दस का दम’ या शो मध्ये सलमान आलेल्या सेलिब्रिटींबरोबर मजा करताना दिसत आहे. आपला चित्रपट ‘स्त्री’ च्या प्रमोशनसाठी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर या शो मध्ये पोहचले होते. त्यावेळी सलमाननं धमाल उडवून दिली. इतकंच नाही तर आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे ‘राज’देखील यावेळी सलमाननं प्रेक्षकांसमोर उघड केले.

सलमाननं उघडले अनेक ‘राज’

सलमान खऱ्या आयुष्यातदेखील अतिशय मिळून मिसळून मस्तीच्या अंदाजात दिसून येतो. ‘दस का दम’च्या सेटवर सलमाननं आपल्या आयुष्यात घडलेल्या काही मजेशीर गोष्टी राजकुमार आणि श्रद्धाबरोबर शेअर केल्या. यावेळी त्यानं एक गोष्ट सांगितली. ‘एकदा आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या घरी तिच्याशिवाय कोणीही नसताना गेलो होतो. पण अचानक तिचे आई-बाबा आले. त्यावेळी मी कपाटात लपून बसलो. पण कपाटात असलेल्या धुळीमुळं सर्व काम बिघडलं. तिच्या वडिलांनी मला पकडलं. पण नशीब तिच्या बाबांना मी आवडलो. अशा घटना बऱ्याच मुलांबरोबर नक्कीच घडल्या असतील,’ असा अनुभव त्यानं राजकुमारला सांगितला. यावर राजकुमारनंदेखील आपल्याबरोबर घडलेला किस्सा रंगवून सांगितला. ‘मी पण अशा परिस्थितीतून गेलो आहे. तेव्हा मला आणि माझ्या गर्लफ्रेंडला घराच्या बाल्कनीमध्ये दोन तास लपून बसावं लागलं होतं,’ असं राजकुमारनं सलमानला सांगितलं.

- Advertisement -

श्रद्धा आणि राजकुमार सध्या व्यस्त

‘स्त्री’ व्यतिरिक्त श्रद्धा सध्या सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये काम करत आहे. तर, शाहिद कपूरबरोबर ‘बत्ती गुल मीटर चालू’च्या चित्रीकरणातही ती सध्या व्यस्त आहे. याशिवाय ‘बाहुबली’ स्टार प्रभासबरोबर ‘साहो’ चित्रपटातही श्रद्धा दिसणार आहे. तर राजकुमार राव ‘मेंटल है क्या’ आणि ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -