जेव्हा तुमचा चित्रपट ईमानदार असतो, तेव्हा तो यशस्वी होतोच…विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत

'द काश्मीर फाईल्स'ला बॉलिवूडने, क्रिटिक्स ने, मीडिया ने , एक्जीबिटर्स ने, अशा अनेकांनी 'द काश्मिर फाईल्स'वर बहिष्कार टाकला होता. परंतु जेव्हा तुमचा चित्रपट ईमानदार असतो...तेव्हा त्याला यशस्वी होण्यापासून जगातील कोणतीही ताकद थांबवू शकत नाही

अनेकांच्या मते 2022 मध्ये हिंदी चित्रपटांसाठी फारसं चांगलं नाही. काही मोजके चित्रपट सोडले तर अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अयशस्वी झाले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमीर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस होऊनही या चित्रपटाने 50 कोटींची कमाई देखील केलेली पाहायला मिळत नाही. इतकंच नाही तर अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाने देखील अजून 35 कोटींची कमाई सुद्धा केलेली नाही.

मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता या प्रकरणावर ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी आपली प्रतिक्रिया त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केली आहे. विवेक अग्निहोत्रींच्या मते, बहिष्कार अनेक चित्रपटांचा होतो. ‘द काश्मीर फाईल्स’ला बॉलिवूडने, क्रिटिक्स ने, मीडिया ने , एक्जीबिटर्स ने, अशा अनेकांनी ‘द काश्मिर फाईल्स’वर बहिष्कार टाकला होता. परंतु जेव्हा तुमचा चित्रपट ईमानदार असतो…तेव्हा त्याला यशस्वी होण्यापासून जगातील कोणतीही ताकद थांबवू शकत नाही.

विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एकामागे एक अनेक ट्वीट शेअर करत लिहिलंय की, जेव्हा चांगल्या कंटेंट मधील लहान चित्रपट बॉलिवूडमधील गुंडांद्वारे उद्धवस्त केले जातात तसेच त्यांच्यावर बहिष्कार देखील टाकले जातात. जेव्हा त्यांचे चित्रपट मल्टीप्लेक्सवरून काढले जातात. जेव्हा लहान चित्रपटांविरूद्ध क्रिटिक्स गँग बनवून अनेकजण एकसाथ उभे राहतात. तेव्हा कोणीही त्या 250 गरीबांचा विचार नाही करत ज्यांनी या चित्रपटामध्ये जीव ओतून काम केलं आहे. तसंच त्यांनी बॉलिवूड देखील चालवलं आहे.

विवेक अग्निहोत्रींनी केलं आणखी एक ट्वीट
विवेक अग्निहोत्रींनी आणखी एक ट्वीट केल आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, तेव्हा कोणीही आपला आवाज का नाही काढत जेव्हा बॉलिवूडमधील किंग आणि इतर सहकलाकार, दिग्दर्शक, लेखक यांच्या करिअरवर लोक बहिष्कार टाकतात, बॅन करतात? ज्या दिवशी सामान्य माणसांना बॉलिवूडमधील या गुंडाचा हिंदू फोबिया लक्षात येईल, तेव्हा ते स्वतः गरम कॉफीमध्ये उडी घेतील.


हेही वाचा :‘लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप होताच आमीर खानने घेतली राज ठाकरेंची भेट