Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन शाहरुखचं कौतुक करताच पाकिस्तानी खासदाराने केली माहिरा खानची खरडपट्टी

शाहरुखचं कौतुक करताच पाकिस्तानी खासदाराने केली माहिरा खानची खरडपट्टी

Subscribe

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पाकिस्तानातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने बॉलीवूडमध्ये देखील शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात शाहरुख आणि माहिराची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. या चित्रपटामुळे माहिराला भारतात प्रसिद्धी मिळाली. सध्या दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही माहिरा अनेकदा तिचा भारतात काम करण्याचा अनुभव शेअर करत असते. दरम्यान, अशातच पाकिस्तानच्या कला परिषदेने कराचीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये माहिरा खाननेही सहभाग घेतला आणि तिने सर्व मुद्द्यांवर आपले मत मांडले.

माहिरा तिच्या बॉलिवूडमधील अनुभवाबद्दल आपलं मत व्यक्त करत होती. ती म्हणाली की, “शाहरुख खान माझ्या काळातील हिरो आहे आणि मी त्याच्या प्रेमात होते आणि त्याच्यासोबत काम करणं माझं एक स्वप्न होतं. जे कधी पूर्ण होईल हे मलाही माहीत नव्हतं. मला ती संधी मिळाली. पण, मी जेव्हा इंडस्ट्रीत आले, तेव्हा अनेकांनी मला नाकाची सर्जरी करून घेण्याचा सल्ला दिला. मी या सल्ल्याबद्दल विचार करत होते. अशातच एकदा शाहरुख खान आणि मी एक सीन करत होतो त्यावेळी त्याने मला याबाबत चांगला सल्ला दिला आणि मी नाकाच्या सर्जरीचा विचार मनातून काढून टाकला.” असं माहिरा म्हणाली.

- Advertisement -

पुढे माहिराला विचारण्यात आलं की, “2-3 राजकीय गट सुरू आहेत, मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? या प्रश्नाच्या उत्तरावर, माहिरा आधी शांत राहिली आणि नंतर ती म्हणाली, “एक चित्रपट आला आहे.. मी ‘पठाण’च्या बाजूने आहे.” यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाचे नावही हावभावात घेतले. परंतु माहिराचं हे उत्तर एका पाकिस्तानी खासदाराला आवडलं नाही. त्यामुळे त्याने सोशल मीडियावरुन तिच्या टीका केली.

- Advertisement -

या खासदाराचे नाव डॉ. अफनान उल्लाह असून त्याने ट्वीटमध्ये लिहिलंय की, “माहिरा खान मानसिक रुग्ण आहे आणि होस्ट अन्वर मकसूद नशेत आहे. या दोन्ही निर्लज्जांना जनता शिव्या देत आहे. माहिरा खानच्या व्यक्तिरेखेवर पुस्तकं लिहिली जाऊ शकतात की ती भारतीय कलाकारांची पैशांसाठी खुशामत करते,” असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय.


हेही वाचा :

- Advertisment -