Aryan Khan Drug Case: संजूबाबा ते भाईजानला जामीन मिळवून देणारे वकील सतीश मानेशिंदे आहेत तरी कोण?

who is aryan khan lawyer satish maneshinde has represented sanjay dutt and salman khan case also
Aryan Khan Drug Case: संजूबाबा ते भाईजानला जामीन मिळवून देणारे वकील सतीश मानेशिंदे आहेत तरी कोण?

बॉलिवूडचा किंग खानने (Shahrukh khan) आपला मुलगा आर्यना खानला (aryan khan) ड्रग्स प्रकरणी (Drug Case) अटक केल्यानंतर याप्रकरणी आपली ठाम बाजू मांडण्यासाठी एक लोकप्रिय वकील निवड केली आहे. ज्यांचे नाव सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) असे आहे. सतीश मानेशिंदे एक हायप्रोफाईल वकील आहेत, जे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (NCB) शाहरुख खानच्या मुलगा आर्यनवर लावल्या आरोपांविरोधात न्यायालयात त्याचा बचाव करतील. ५६ वर्षांचे वरिष्ठ वकील सतीश मानेशिंदे हायप्रोफाईल केससाठी ओळखले जातात. आतापर्यंत अनेक टॉप बॉलीवूड स्टार्स आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या केस सतीश मानेशिंदे यांनी लढवल्या आहेत.

रिया चक्रवर्तीचे पण वकील होते सतीश मानेशिंदे

ड्रग्स प्रकरणातील सतीश मानेशिंदे अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Riya Chakravarthi)आणि तिचा भाऊ शौविकची (showik) केसपण लढत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने रिया आणि तिच्या भावाला अटक केली होती. पण रिया आणि शौविकाला न्यायालयाने जामीन दिला आहे.

सतीश मानेशिंदे क्रिमिनल केसेस हातळण्यासाठी जास्त ओळखले जातात. अशा केस हातळण्याचा त्यांचा अनुभव जास्त आहे. याशिवाय पालघर लिंचिंग प्रकरणात ते स्पेशल पब्लिक प्रोसेक्यूटर होते.

संजय दत्तला मानेशिंदे यांनी मिळवून दिला जामीन

१९९३मध्ये झालेल्या हल्ल्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे (Sanjay Dutta) प्रतिनिधित्व करणाऱ्या कायदेशीर टीमचा भाग मानेशिंदे राहिले होते. मानेशिंदे यांना संजय दत्तला जामीन मिळवून देण्यात यश मिळाले होते. यादरम्यान त्यांच्यावर खूप गंभीर आरोप लावण्यात आले होते. परंतु या केसनंतर सतीश मानेशिंदे सर्व हाय प्रोफाईल प्रकरणासाठी देशातील टॉप क्रिमिनिल वकीलमधील एक झाले.

सलमानला निर्दोषमुक्त करण्यासाठी मानेशिंदे यांनी केली मदत

२००२मध्ये दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अटक करण्यात आलेल्या सलमान खानला (Salman Khan) जामीन मिळाल्यानंतर मानेशिंदे यांना हाय-प्रोफाईल वकील म्हणून जास्त लोकप्रियता मिळाली. त्यानंतर सलमान खानला न्यायलयाने निर्दोषमुक्त केले होते.

मानेशिंदे यांनी अशी केली आपल्या करिअरला सुरुवात

१९८३ साली प्रसिद्ध दिवंगत वकील राम जेठमलानी यांच्या नेतृत्वात एक वकील म्हणून मानेशिंदे यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी सुमारे १० वर्षांपर्यंत काम केले. आज मानेशिंदे देशातील सर्वात मोठ्या वकिलांपैकी एक आहेत.


हेही वाचा – NCBच्या चौकशीत सतत रडतोय Aryan, शाहरुख सोबत केवळ २ मिनिटं झालं बोलणं