कोण आहे शाहरुख खान? ‘पठाण’च्या प्रश्नावर आसामच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर पाहून शाहरुखचे अनेक चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला परदेशात सुरुवात झाली होती. परदेशातील अनेक प्रेक्षक चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद देत आहेत. शिवाय भारतामध्ये देखील प्रेक्षक अॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, अशातच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ‘पठाण’ चित्रपटाबाबत वक्यव्य केलं आहे.

एका पत्रकार परिषदेमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना ‘पठाण’ चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी, शाहरुख खान कोण आहे? असा उलट प्रश्न पत्रकारांनाच विचारला. मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आहेत.

चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

jagran

jagran
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या व्हिडीओवर एका युजरमे कमेंट करत लिहिलंय की, “एका पाचवी पास विद्यार्थ्यापेक्षा देखील खूप कमी माहिती आहे यांच्याकडे” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलंय की, “तुम्ही ‘पठाण’चा कचरा करुन टाकला.”

शाहरुखचं 4 वर्षानंतर पदार्पण
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

 


हेही वाचा :

‘अवतार 2’ ठरला भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट