घरमनोरंजनअग्गंबाई सूनबाईमध्ये कोण आहे नवीन शुभ्रा? जाणून घ्या

अग्गंबाई सूनबाईमध्ये कोण आहे नवीन शुभ्रा? जाणून घ्या

Subscribe

सध्या प्रचंड लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे अग्गंबाई सासूबाई. ही मालिका फार कमी वेळातच महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मालिकेतील दमदार कलाकारांनी ही मालिका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अग्गंबाई सासू बाई मालिकेच्या जागी प्रेक्षकांना आता अग्गंबाई सूनबाई ही मालिका पहायला मिळणार आहे. अग्गंबाई सूनबाई ही मालिका म्हणजेच अग्गंबाई सासूबाई मालिकेचा दुसरा भाग असणार आहे. मात्र आता या दुसऱ्या भागात शुभ्राची जागा एक नवी अभिनेत्री घेणार आहे. ती कोण असणार यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

- Advertisement -

अग्गंबाई सूनबाई या नव्या मालिकेत आसावरी म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिजीत राजे म्हणजेच अभिनेते गिरीश ओक हे मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहेत. शुभ्राच्या जागी ‘उमा पेंढारकर’ ही नवी अभिनेत्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे. उमा याआधी ‘स्वामिनी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. स्वामिनी मालिकेत उमाने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. उमा आता शुभ्राच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वामिनीमधील पार्वतीबाई आणि आता शुभ्रा या दोन्ही व्यक्तिरेखा भिन्न आहेत. उमा आता शुभ्राची भूमिका कशी साकारणार आहे याकडे प्रेक्षकांचेही लक्ष आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by swamini (@swamini_official_)


आसावरी, अभिजीत आणि शुभ्राच्या भूमिका कोण साकारणार हे समोर आले आहे. मात्र सोहम म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या बबड्याची भूमिका कोण साकारणार आहे हे अद्याप समोर आलेले नाही. अग्गंबाई सूनबाई या मालिकेचे शिर्षक गीतही काहीस वेगळ असणार आहे. अग्गं बाई सासूबाई या मालिकेप्रमाणेच अग्गंबाई सूनबाई ही मालिकाही प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा सर्वांना आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रियांका चोप्राचा ड्रेस पाहून लोकं म्हणाले, चल रे भोपळ्या टूणूक टूणूक

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -