Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन कोण साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका?'या' तीन अभिनेत्यांची नावे यादीत समाविष्ट

कोण साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका?’या’ तीन अभिनेत्यांची नावे यादीत समाविष्ट

आयुष्मान,राजकुमार,रणदीप या तीनही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाच्या जोरावर स्थान मिळवलं आहे.

Related Story

- Advertisement -

दिग्दर्शक,अभिनेता महेश मांजरेकर यांनी नुकतच काही दिवसांपूर्वी विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवणार असल्याचे घोषित केले आहे. आणि त्यानंतर चर्चा रंगू लागल्या आहेत त्या सावरकरांची भूमिका सिनेमात कोण साकारणार? याची. सध्या रुपेरी पडद्यावर दिवसेंदिवस जीवनपट अर्थात बायोपिक सिनेमांची भर पडतांना दिसतेय. विनायक दामोदर सावरकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं पात्र कोण रंगवणार यासाठी अनेक कालाकरांच्या नावांची चर्चा बॉलिवूड मध्ये रंगत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ असे शीर्षक असणार्‍या सिनेमात तीन बॉलिवूड अभिनेत्यांची नावं शर्यतीत आहे असं बोलण्यात येत आहे. यामध्ये आयुष्मान खुराना,रणदीप हुड्डाआणि राजकुमार राव यांचे नावं समोर आली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर एवढ्या दिग्गज व्यक्तिमत्व असणार्‍या माणसाची भूमिका साकारणारा अभिनेता देखील तितकाच कसलेला असावा तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी केलेलं कार्य हे चित्रपटात काही वेळात मांडण अशक्य आहे. मुळातच यासाठी अभिनयाची उत्तम जाण असणारा तसेच भूमिकेला न्याय मिळवून देणारा कलाकारच स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका उत्तमरीत्या बजावू शकेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

- Advertisement -

आयुष्मान,राजकुमार,रणदीप या तीनही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाच्या जोरावर स्थान मिळवलं आहे. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सिनेमात कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


हे हि वाचा – Oh My God 2: मध्ये दिसणार अक्षय आणि पंकज त्रिपाठीचा अॅक्टिंगचा तडका

- Advertisement -