घरमनोरंजनशुक्रवारीच का होतात चित्रपट प्रदर्शित? हिंदी चित्रपटांपासून झाली होती सुरुवात

शुक्रवारीच का होतात चित्रपट प्रदर्शित? हिंदी चित्रपटांपासून झाली होती सुरुवात

Subscribe

शुक्रवारी चित्रपट प्रदर्षित झाल्यापासूनच प्रेक्षक चित्रपट गृहात गर्दी करतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की चित्रपट हे शुक्रवारीच का प्रदर्शित होतात? जाणून घ्या

चित्रपट गृहामध्ये एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला की प्रेक्षक लगेचच चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहांमध्ये गर्दी करतात. प्रत्येकजण आठवडाभर काम करून काही प्रमाणात थकलेला असतो. अश्यावेळी लोकांना मनोरंजनाची गरज असते अश्यावेळी लोक काही प्रमाणात रोजच्या कामापासून थोडा विरंगुळा म्हणून वीकएन्डला(week end) चित्रपट पाहण्यासाठी जातात. शुक्रवारी चित्रपट प्रदर्षित झाल्यापासूनच प्रेक्षक चित्रपट गृहात गर्दी करतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की चित्रपट हे शुक्रवारीच का प्रदर्शित होतात? जाणून घ्या

हे ही वाचा –   ‘विठ्ठलाचा टिळा आणि गुगल मॅप्स अनोखं कनेक्शन’, ज्ञानेश्वर माऊली साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘ती’…

- Advertisement -

शुक्रवारीच का होतात चित्रपट प्रदर्शित

कोणताही चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित होतो याच्या मागेही एक खूप रंजक गोष्ट आहे. यातला पाहीला भाग असा की मुळात हॉलिवूड चित्रपटांमधून हा पूर्ण ट्रेंड आला आहे. १५ डिसेंबर १९३९ ला हॉलिवूडचा चित्रपट ‘गॉन विद द विंड’ हा चित्रपट पहिल्यांदा शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. तर भारतात १९६० सालच्या आधी अशी काही पद्धत नव्हती की चित्रपट हे शुक्रवारीच प्रदर्शित करावेत. २४ मार्च १९४७ साली ‘निल कमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तो दिवस होता सोमवार.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिजमध्ये भारत गणेशपुरेंची दमदार एन्ट्री

मुगल – ए – आजम पहिला चित्रपट

चित्रपट सृष्ष्टीतला एक लक्षवेधी चित्रपट म्हणजे मुगल – ए – आजम(Mughal-e-Azam) हा चित्रपट शुक्रवार ५ ऑगस्ट १९६० साली प्रदर्शित झाला होता. ह्या चित्रपटाने त्यावेळीचा काळ गाजवला होता. हा चित्रपट खूप जास्त लोकप्रिय झाला. या चित्रपटाची गाणी आणि संवाद आजही अनेकांच्या लक्षात आहे. मुगल – ए – आजम हा चित्रपट खूप जास्त यशस्वी झाला होता. आणि या नंतर हॉलिवूड प्रमाणे बॉलिवूड मध्येही शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याची प्रथा सुरु झाली. आणि त्यांनतर कोणताही चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होऊ लागले. या मागचे एक कारण असेही ही आहे की बहुतांश लोकांना शनिवार आणि रविवार सुट्टी असते. आणि शुक्रवारी लोकं आपापली कामं संपवून शनिवार आणि रविवारी वीक एन्ड एन्जॉय करण्यासाठी विविध ऑप्शन्स शोधात असतात. अशातच प्रेक्षकांसाठी शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करून शनिवार आणि रविवार या दोनही दिवशी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा एक मार्ग मोकळा करून देत असतात. त्यामुळे व्यवसायीक दृष्ट्या सुद्धा चित्रपटाचे प्रदर्शन फायदेशीर ठरते.

हे ही वाचा –   अमिताभ बच्चन यांनी घेतलं सायन येथील विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन; फोटो व्हायरल

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -