वारंवार आमंत्रण देऊनही कपिल शर्मा शोमध्ये का जात नाही धोनी? कारण आलं समोर

कपिल शर्मा शो अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे.

Why dhoni do not go to kapil sharma show after Despite the invitation
वारंवार आमंत्रण देऊनही कपिल शर्मा शोमध्ये का जात नाही धोनी? कारण आलं समोर

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावतात. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा कार्यक्रम संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. केवळ सेलिब्रेटीच नाही तर इतर क्षेत्रातील लोक देखील कपिल शर्मा शोमध्ये सहभागी होत असतात. आठवड्यातून दोन वेळा कपिल शर्मा शोमधून प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले जाते. यावेळी आलेल्या पाहुण्यांचे जंगी स्वागत केले जाते त्याचप्रमाणे त्यांच्यावर अनेक विनोद देखील केले जातात. आजवर अनेक क्रिकेटर्स देखील कपिल शर्माच्या मंचावर येऊन गेले आहेत. मात्र क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आजवर कपिल शर्माच्या मंचावर दिसला नाही. वारंवार आमंत्रण देऊनही धोनी या कार्यक्रात सहभागी होत नाही असे म्हटले जात आहे. यामागचे कारण आता समोर आले आहे.

 

महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा २०१६मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टिमने कार्यक्रमात हजेरी लावली होती. धोनीला देखील आंमत्रण देण्यात आले होते. मात्र आमंत्रण मिळूनही धोनीने कार्यक्रमात हजेरी लावली नव्हती. कपिल शर्मा शोमध्ये हजर न राहण्याचे कारणही धोनीने त्यावेळी सांगितले नव्हते. धोनी त्यावेळी त्याच्या कामांमध्ये व्यस्त होता त्यामुळे तो आला नव्हता, असे सांगण्यात येत आहे.

केवळ धोनीच नाही सिनेसृष्टील अनेक मंडळींनी कपिल शर्मा शोमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता आमिर खान देखील आजवर कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झालेला नाही. सचिन तेंडूलकरला स्वत: नवजोत सिंह सिद्धूने आमंत्रण दिले होते मात्र तरीही सचिन कार्यक्रमाला गेला नव्हता.

कपिल शर्मा शो अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. कलाकारांचे अपमान केल्याप्रकरणी तसेच स्किटमध्ये दाखवण्यात आलेल्या काही गोष्टींवर देखील अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. नुकताच महाभारत मालिकेतील टिम कार्यक्रमात आली होती. त्यावेळी पुरुषांना महिलांचे कपडे घालून अश्लील हावभाव केले होते. तेव्हा देखील अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला होता.


हेही वाचा – Amruta Fadnavis: अखेर अमृता फडणवीसांनी जाहीर केलेले तुफानी गाणं प्रदर्शित