फिटनेस फ्रीक सुष्मिताला हृदयविकाराचा झटका का आला? डॉक्टरांनी दिली माहिती

नुकत्याच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला होता. याबाबत तिने स्वतः 2 मार्च रोजी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत खुलासा केला होता. सुष्मिता सारख्या फिटनेस फ्रीक अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी कळताच अनेकांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, आता सुष्मिताची प्रकृती पूर्वीपेक्षा व्यवस्थित आहे.

सुष्मिता सारख्या फिटनेस फ्रीक अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर आता सुष्मिताच्या डॉक्टरांनीच दिलं आहे.

सुष्मिताचे कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर राजीव भागवत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “सुष्मिताच्या नियमीत शारीरिक हालचालींमुळे तिचे हृदय अधिक नुकसान होण्यापासून वाचले. मी म्हणेन की ती खूप भाग्यवान आहे की ती योग्य वेळी योग्य ठिकाणी आली. सुष्मिता शारीरिकदृष्ट्या सक्रिय होती, त्यामुळे जास्त त्रास झाला नाही. कोणताही व्यायाम आठवड्यातून 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त नसावा. तसेच आरामासाठी पुरेशी झोप देखील घेतली पाहिजे, जर तुम्ही सतत व्यायाम करत असाल आणि त्यानंतर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर ते शरीरासाठी खूप घातक ठरू शकते. जिमला जाण्याआधी कमीत कमी 7-8 तासांची झोप आवश्यक आहे.” असं डॉक्टर राजीव भागवत म्हणाले.

डॉक्टर राजीव भागवत पुढे म्हणाले की, “अलीकड्च्या महिला अधिक आव्हान आणि जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. ऑफिस सोबतच त्यांना घरातील काम देखील करायचे असते. ज्यामुळे त्यांना सतत तणावाचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, उच्च कोलेस्ट्रॉल पातळी इत्यादी देखील हृदयविकाराच्या जोखमीचे घटक आहेत.” असं सुष्मिताचे कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर राजीव भागवत म्हणाले.


हेही वाचा :

7 एप्रिल 2023 रोजी होणार ’जुबली’चा ग्लोबल प्रीमियर