घरमनोरंजनशम्मी कपूर आणि मुमताजच्या प्रेमाचा का झाला शेवट?

शम्मी कपूर आणि मुमताजच्या प्रेमाचा का झाला शेवट?

Subscribe

मुमताजच्या सौंदर्याचे अनेक चाहते होते. शिवाय बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते शम्मी कूपर यांना देखील मुमताज खूप आवडायची. खरंतर 'ब्रह्मचारी' या चित्रपटात शम्मी कपूर आणि मुमताजने पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं

बॉलिवूडची एवरग्रीन अभिनेत्री मुमताजचा आज ७५ वा वाढदिवस आहे. मुमताज बॉलिवूडमधील त्या निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या आपल्या अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखल्या जातात. मुमताजने वयाच्या ११ व्या वर्षापासून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. सोने की चिडिया हा मुमताजचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर मुमताजने मागे वळून पाहिलं नाही. एकानंतर एक असे अनेक सुपरहिट चित्रपट मुमताजने दिले. अवघ्या कमी वेळात मुमताज बॉलिवूडची सुपरस्टार झाली. सोबतच मुमताजने राजेश खन्ना आणि शम्मी यांच्यासोबत मुमताजने अनेक हिट चित्रपट दिले.

मुमताजच्या सौंदर्याचे अनेक चाहते होते. शिवाय बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते शम्मी कूपर यांना देखील मुमताज खूप आवडायची. खरंतर ‘ब्रह्मचारी’ या चित्रपटात शम्मी कपूर आणि मुमताजने पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ या प्रसिद्ध गाण्यामध्ये दोघांची ऑनस्क्रिन पाहून चाहत्यांचं मन जिंकलं होतं. त्या काळातील बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध जोडी म्हणून पाहिलं जातं होतं. या चित्रपटात काम करता करता दोघ एकमेकांना पसंद करू लागले. शम्मी कपूर मुमताज पेक्षा २० वर्षाने मोठे होते. अनेक वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर शम्मी कपूर यांनी मुमताजला लग्नाची मागणी घातली. मात्र त्यांनी मुमताजला एक अट देखील घातली की, लग्नानंतर मुमताज चित्रपटांमध्ये काम करणार नाही. ही अट मुमताजला मान्य नव्हती त्यामुळे मुमताजने त्यांना नकार दिला. त्यानंतर शम्मी कपूर यांनी कोणत्याच अभिनेत्रीसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला त्यांनी काही काळानंतर नीला देवीसोबत लग्न केलं. १९७४ मध्ये मुमताजने मयूर मधवानीशोबत लग्न केलं.

- Advertisement -

मुमताजचं फिल्मी करिअर
वयाच्या ११ व्या वर्षापासून मुमताजने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. ब्रह्मचारी, लोफर, दो रास्ते , आदमी और इंसान, तेरे मेरे सपने, जीने दो, पत्थर के सनम, खिलौना, मास्टरजी, राम और श्याम, सच्चा-झूठा, आपकी कसम, अपना देश, प्रेम कहानी, दुश्मन, बंधन, रोटी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


हेही वाचा :रॅम्प वॉकनंतर रणवीर सिंह पडला आईच्या पाया… नेटकरी म्हणाले, आई तुमच्या मुलाला समजावा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -