घरताज्या घडामोडीसुशांतला मृत्यू आधीच केले होते मृत घोषित; पहा विकिपिडिया पेज

सुशांतला मृत्यू आधीच केले होते मृत घोषित; पहा विकिपिडिया पेज

Subscribe

सुशांतच्या आत्महत्येपूर्वीच विकिपिडियाने त्याला मृत घोषित केले होते, असा दावा सोशल मीडियाद्वारे केला जात आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने अचानक एक्झिट घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचे आत्महत्येचे कारण अद्याप पुर्णतः स्पष्ट झाले नाही. मात्र, त्याच्या आत्महत्येमुळे अनेक जण तर्कवितर्क लावत आहेत. त्यामुळे पोलीस देखील वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेमागचा शोध घेत आहेत. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्येपूर्वीच विकिपिडियाने त्याला मृत घोषित केले होते, असा दावा सोशल मीडियाद्वारे केला जात आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या रिपोर्टनुसार सुशांतने १० च्या असपास फळांचा रस घेतला होता. त्यानंतर एक दिड तासांनी त्याने आत्महत्या केली. परंतु, चकित करणारी बाब म्हणजे त्याच्या विकिपिडिया पेजवर ९ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याचे लिहिले होते. त्यामुळे सुशांतचा मृत्यू होणार आहे हे कोणाला माहित होते? हा प्रश्न सोशल मीडियाद्वारे आता पोलिसांना विचारला जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयने करावी, अशी मागणी देखील केली जात आहे.

- Advertisement -

सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


हेही वाचा – लाल डबा नव्हे तर लालपरी म्हणा….


 

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -