तुला जपणार आहे’ ही मालिका पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांच्या पसतनतीस उतरताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेत या आठवड्यात काय चमत्कार घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असेल. तर या आठवड्यात गावात देवीच्या सणाची सुरुवात एका प्राचीन परंपरेने होते. यासाठी दूरच्या जंगलातील वारुळातून पवित्र माती संकलित करून आणायची आहे. पण पुराणकथेनुसार, वारुळात देवीचा भाऊ एक भयंकर नाग वास्तव्य करतोय. ही पवित्र माती आणण्यासाठी गावातून मीराची निवड झालेय. मीरा सर्पदेवाची मनोभावे प्रार्थना करते आणि वारुळात हात घालून माती काढते. पण मीराविरुद्ध कट रचणाऱ्या रंगराज बाबाने आधीच वारुळात तीन विषारी साप सोडलेत. शिवनाथ ला या गोष्टीची कुणकुण लागताच तो शिवतांडव स्तोत्राचे पठण करून येणार संकट टाळतो. मात्र, त्याच वेळी एक अद्भुत चमत्कार घडतो आणि पहिल्यांदाच तो पुराणकथेतला सुप्रसिद्ध नाग मीराच्या मागोमाग गावापर्यंत येतो! गावकरी हा चमत्कार पाहून थक्क होतात, काहींना भीती वाटते, तर काहींना हे दैवी संकेत वाटतात.
इकडे माया अजूनही वेदाविषयी तिरस्कार बाळगून आहे. ती जाणूनबुजून वेदाची बोटं कारच्या खिडकीत अडकवते. अंबिका हे सर्व पाहते आणि मायाला धडा शिकवणार इतक्यात तिथे मंजिरी येते, आणि माया वेदाची बोटं सोडते. वेदाला असह्य वेदना होतायत, पण माया तिला धमकी देते जर कुणाला काही सांगितलं, तर परिणाम गंभीर असतील! वेदा गुपचूप हे सगळं दुःख सहन करतेय. त्या घटनेनंतर अंबिका मायाला योग्य धडा शिकवण्याचा निश्चय करते. अंबिकाला हे ही समजतं की अजितने अथर्ववर हल्ला करण्याचा कट रचला आहे. तो हल्ला थांबवण्यासाठी अंबिका हुशारीने अशी परिस्थिती निर्माण करते की गुन्हेगार एकमेकांवरच हल्ला करतात. अंबिका अजितच्या कारचा स्टीयरिंग व्हील आपल्या ताब्यात घेऊन त्याला जबरदस्त घाबरवते. शाळेत वेदाला मुलं वारंवार त्रास देतायत. केशवजी आणि शाळेतील नन्स अथर्वला सांगतात की वेदाला आईचा आधार आवश्यक आहे.
अंबिका मायाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. ती मायाचा हात चालू मिक्सरमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते, माया भयभीत होते. मंजिरी पुन्हा एकदा मायाला समजावते तिने आपली वागणूक सुधारली पाहिजे, अज्ञात शक्ती तिला लक्ष्य करत असल्याचे लक्षात आल्यावर माया सर्व काही मंजिरीला सांगते. ती एका तांत्रिकाला भेटते. तांत्रिक तिला दोन दिवसांचा वेळ देतो जर तिने योग्य उपाय केले नाहीत, तर ती वाईट संकटात सापडेल! सणाच्या दुसऱ्या विधीमध्ये पवित्र कलश शोधायचा आहे. रंगराज बाबा काकूसोबत कट रचतो आणि कलश लपवतो. दरम्यान, शिवनाथ स्मशानभूमीत बसून एका नारळावर मंत्रोच्चार करतो. अचानक, लपवलेला कलश तांदळाच्या पिंपातून वर येतो! गावकरी चमत्कार पाहून थक्क होतात, पण मीरा निर्भयपणे त्या शापित विहिरीत उडी मारते. काही वेळासाठी मीरा गायब होते. त्याचवेळेस पाण्यातून एक मोठं कासव वर येतं त्याच्या पाठीवर मीराला आणि पवित्र कलश आहे. गावकरी हे पाहून स्तब्ध होतात, हा आणखी एक दैवी संकेत असल्याचं समजतात.
हेही वाचा : Women’s Day 2025 : अभिनेत्रींची पडद्यामागील हृदयस्पर्शी कथा
Edited By : Prachi Manjrekar