घरमनोरंजनमाझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नवा ट्विस्ट, परीच्या खऱ्या बाबांची मालिकेत एन्ट्री

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नवा ट्विस्ट, परीच्या खऱ्या बाबांची मालिकेत एन्ट्री

Subscribe

झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ (majhi tujhi reshimgath) या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. यश आणि नेहाचा सुखी संसार सुरु होत असतानाच या मालिकेत आता नेहाच्या पहिल्या पतीची एन्ट्री होणार आहे.

झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ (majhi tujhi reshimgath) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील यश, नेहा, समीर, शेफाली या सगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत. या सगळ्या कलाकारांबरोबरच छोट्या परीने सुद्धा तिच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत.या मालिकेत नायिकेची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहेरे(prarthana behere) हिने साकारली आहे. प्रार्थनाने आत्तापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षसकांचं मनोरंजन केले आहे. तर या मालिकेत नायकाची भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade) याने साकारली आहे. श्रेयसने आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी सिने सृष्टीमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेत नुकताच यश आणि नेहाचा विवाह सोहळा पार पडला आहे. त्यामुळे या मालिकेत आनंदी वातावरण आहे. मात्र आता लवकरच या आनंदात विरजण पडणार आहे. यश आणि नेहाचा सुखी संसार सुरु होत असतानाच या मालिकेत आता नेहाच्या पहिल्या पतीची एन्ट्री होणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ(majhi tujhi rehsimgath) ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. पण या मालिकेचा एक प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. झी मराठीच्या(zee marathi)अधिकृत इंस्टाग्रामच्या पेजवर हा मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की, चौधरींच्या पॅलेस मध्ये एका नव्या व्यक्तीची एंट्री होत आहे. आणि ती व्यक्ती पारीसाठी ड्रायव्हर म्हणून मला इथे बोलवण्यात आलं आहे असं सांगते. पण ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून नेहाचा पहिला पती आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या म्हणजेच ‘अविनाश’ च्या येण्याने नेहा आणि पारीच्या आयुष्यात नवं वादळ येणार आहे. त्याचबरोबर यश आणि नेहाच्या सुरु असलेल्या सुखी संसारात अविनाशच्या येण्याने विघ्न येणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा -अभिनेत्री श्रेया बुगडेचा इंडो – वेस्टर्न साडीमधला खास लुक

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

नेहाच्या पहिल्या पतीची भूमिका या मालिकेत अभिनेता निखिल राजेशिर्के(nikhil rajeshirke) साकारणार आहे. निखिल राजेशिर्केने आत्तापर्यंत अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्येही निखिलने भूमिका साकारल्या आहेत. नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत अभिनेता निखिल राजेशिर्के याने स्वतःची एक वेगळी ओळख मराठी चित्रपट सृष्टीमध्ये निर्माण केली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये निखिल खलनायकाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला कोणते नवीन वळण येणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -